Fri, Jul 19, 2019 01:07होमपेज › Mumbai-Thane-Raigad › सरकारचा ‘मेस्मा’चा इशारा

सरकारचा ‘मेस्मा’चा इशारा

Published On: Aug 08 2018 1:50AM | Last Updated: Aug 08 2018 1:05AMमुंबई : कर्मचारी संघटनांनी पुकारलेल्या संपाचा फारसा परिणाम दिसून आला नसून, मंत्रालयात जवळपास 70 टक्क्यांपेक्षा जास्त अधिकारी व कर्मचार्‍यांची उपस्थिती होती. मंत्रालय वगळता उर्वरित शासकीय कार्यालयांमध्ये 37 टक्क्यांपेक्षा जास्त अधिकारी व कर्मचारी कामावर हजर होते, असा दावा राज्य सरकारने केला आहे. 

अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी जर कामावर हजर झाले नाहीत, तर त्यांच्यावर ‘मेस्मा’अंतर्गत कारवाई करण्याचा, तर अन्य कर्मचार्‍यांवर शिस्तभंगाची कारवाई करण्याचा इशाराही राज्य सरकारने दिला आहे. कर्मचारी संघटनेनेे संपाला मोठा प्रतिसाद मिळाल्याचा दावा केला असला, तरी राज्य सरकारने या संपाचा फारसा परिणाम झाला नसल्याचे म्हटले आहे.