Tue, Apr 23, 2019 23:47होमपेज › Mumbai-Thane-Raigad › सरकारी कर्मचार्‍यांचा संपाचा दिवस रजा म्हणून गृहीत धरणार

सरकारी कर्मचार्‍यांचा संपाचा दिवस रजा म्हणून गृहीत धरणार

Published On: Jan 07 2018 2:02AM | Last Updated: Jan 07 2018 1:53AM

बुकमार्क करा
मुंबई : प्रतिनिधी

राज्य सरकारी व निमसरकारी तसेच शिक्षक कर्मचारी संघाने आपल्या विविध मागण्यांसाठी दि. 2 सप्टेंबर 2016 रोजी एक दिवसाचा राज्यव्यापी लाक्षणिक संप केला होता. त्यावर सरकारने संपाचा हा दिवस असाधारण रजा म्हणून गृहीत धरण्याचा निर्णय घेतला आहे.

सरकारच्या या निर्णयामुळे  हा एक दिवसाचा संप सेवेतील खंड न मानता त्यांची सेवा अखंडित धरली जाणार आहे. राज्यात 16 लाखांवर त्यांचा संख्या असून त्यांना या निर्णयाचा फायदा मिळणार आहे. एका संपासाठी जेमतेम एका रजेचा त्याग करावा लागणार असला तरी सेवेत खंड पडणार नाही.