Sun, Jun 16, 2019 12:09
    ब्रेकिंग    होमपेज › Mumbai-Thane-Raigad › सरकारी विभागांचा डेटा उपलब्ध होणार ‘क्‍लाऊड’वर

सरकारी विभागांचा डेटा उपलब्ध होणार ‘क्‍लाऊड’वर

Published On: Jan 18 2018 1:57AM | Last Updated: Jan 18 2018 1:19AM

बुकमार्क करा
मुंबई : वृत्तसंस्था

सर्वच सरकारी विभागांचा डेटा क्‍लाऊडवर साठवण्याचे धोरण राबवणारे महाराष्ट्र हे पहिले राज्य ठरणार आहे. ‘पब्लिक क्‍लाऊड’ धोरणाचे आम्ही अनावरण केले असून सर्व सरकारी विभागांना यापुढे त्याचा उपयोग करावा लागेल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्र तंत्रज्ञान परिषदेत बोलताना सांगितले.

या धोरणामुळे खासगी गुंतवणुकीला चालना मिळेल, असा विश्‍वासही त्यांनी व्यक्‍त केला. मोठ्या प्रमाणावर डेटा गोळा होत असल्याने सरकार हा खासगी कंपन्यांसाठी सर्वात मोठा ग्राहक असेल, असेही फडणवीस म्हणाले. राज्य शासनाच्या या निणर्यामुळे या क्षेत्रातील खासगी कंपन्यांना दोन अब्ज डॉलर गुंतवणुकीची संधी उपलब्ध झाली आहे. सध्या डेटा साठवण्यासाठी प्रत्येक विभागाकडे स्वतंत्र अशी व्यवस्था आहे.

क्‍लाऊड स्टोअरेज वापराचे धोरण तयार करण्यासाठी दोन महिन्यांपूर्वी राज्य शासनाने चार जणांच्या एका समितीची नियुक्‍ती केली होती. या समितीच्या शिफारशींनुसार पब्लिक क्‍लाऊड धोरण तयार करण्यात आले आहे.