Mon, May 20, 2019 22:35होमपेज › Mumbai-Thane-Raigad › विद्यार्थ्यांच्या आंदोलनाने सरकारचे अपयश समोर : मुंडे 

विद्यार्थ्यांच्या आंदोलनाने सरकारचे अपयश समोर : मुंडे 

Published On: Mar 20 2018 10:48AM | Last Updated: Mar 20 2018 10:51AMमुंबई : पुढारी ऑनलाईन 

प्रशिक्षण घेऊनही बेरोजगारीचा शिक्का माथी बसल्याने संतापलेल्या रेल्वे प्रशिक्षणार्थींनी मध्य रेल्वे मार्गावर दादर आणि माटुंगा दरम्यान चक्काजाम आंदोलन केले. आंदोलनाला दोन ते तीन तास होऊनही रेल्‍वे प्रशासनाने या आंदोलकांची दखल घेतली नाही. त्‍यामुळे सर्वच स्‍तरातून प्रशासन आणि भाजप सरकारवर टीका होत आहे. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनीही आपल्‍या ट्विटर अकाउंटवरून सरकारवर जोरदार टीका केली.  

वाचाविद्यार्थ्यांनी माटुंगा रेल्‍वे अडवली, वाहतूक विस्‍कळीत(व्हिडिओ)

वाचाआंदोलन मुंबईमध्ये, झळ बदलापूरला

‘‘रेल्वेभरती परिक्षेसाठी इतक्या मोठ्या संख्येने विद्यार्थी आंदोलन करणार आहेत याची गंध वार्ताही सरकारला असू नये हे Intelligence Failure आहेच तसेच  गेल्या 3 वर्षात सातत्य पूर्ण रित्या रोजगार निर्मितीतील अपयश हे आता रस्त्यावरील विद्यार्थी व बेरोजगारांच्या उग्र आंदोलनाने समोर आणले आहे.’’ असे ट्विट धनंजय मुंडे यांनी केले आहे.

रेल्वे प्रशिक्षणार्थींनी मध्य रेल्वे मार्गावर दादर आणि माटुंगा दरम्यान लोकल आणि एक्‍सप्रेस अडवून चक्काजाम आंदोलन केले. रोज विविध कारणांमुळे रेल्वेच्या गोंधळाला सामोरं जाणाऱ्या प्रवाशांना आज या आंदोलनाचा फटका बसला. लोकल गाड्यांची वाहतूक पूर्णपणे बंद झाल्याने प्रवाशांना माटुंगा ते दादर हे अंतर चालत पार करावे लागले. लांब पल्ल्याच्या गाड्यांवरही या आंदोलनाचा परिणाम झाला आहे. 

Tags : Government, railway, recruitment, student, dhananjay munde