Thu, Sep 21, 2017 23:19होमपेज › Mumbai-Thane-Raigad › आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांना नोकरीत प्राधान्य 

आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांना नोकरीत प्राधान्य 

Published On: Sep 13 2017 7:29PM | Last Updated: Sep 13 2017 7:43PM

बुकमार्क करा

मुंबई: पुढारी ऑनलाईन 

आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांना राज्य सरकारकडून नोकरीत प्राधान्य देणार असल्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी हा प्रस्ताव मांडला होता. या प्रस्तावाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मान्यता दिली आहे. 

शिवसेनेकडून गेल्या २ वर्षांपासून आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबातील एका व्यक्तीला सरकारी नोकरीत प्राधान्य द्यावे, अशी मागणी केली जात होती. या प्रस्तावाला मुख्यमंत्र्यांनी मान्यता दिल्याचे परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी सांगितले. 

आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांना सर्व सरकारी विभागांतील 'क' श्रेणीच्या पदावर नोकरीत प्राधान्य दिले जाणार असल्याचे रावते म्हणाले.