Fri, Sep 21, 2018 04:14होमपेज › Mumbai-Thane-Raigad › आता सरकारनेच माझे पुनर्वसन करावे: गोपाल शेट्टे

आता सरकारनेच माझे पुनर्वसन करावे: गोपाल शेट्टे

Published On: Feb 05 2018 1:47AM | Last Updated: Feb 05 2018 1:47AMमुंबई : प्रतिनिधी

मी बलात्कार केलेला नसताना पोलीसांनी जाणूनबुजून  बलात्काराच्या खोट्या गुन्ह्यात मला अटक केली. या गुन्ह्यातून तब्बल 7 वर्षानंतर माझी निर्दोष सुटका झाली आहे. पण तुरूंगाबाहेर आल्यानंतर माझे संपूर्ण कुटुंबच उध्वस्त झाल्याचे निदर्शनास आले. आता सरकारनेच माझे पुनर्वसन करावे, अशी मागणी गोपाल रामदास शेट्टे याने केली आहे.

यासंदर्भातील अधिक माहिती अशी, दि. 19 जुलै2009 रोजी घाटकोपर रेल्वे स्थानकावर एका गरीब मतिमंद महिलेवर बलात्कार झाला होता. या घटनेनंतर पोलीस दलात एकच खळबळ उडालेली होती. यात संशयीत म्हणून घाटकोपरच्या(पूर्व) नित्यानंदनगर याठिकाणी राहणारे व इलेक्ट्रीशयनचे काम करणारे गोपाळ रामदास शेट्टे याला पोलीसांनी ताब्यात घेतले व पोलीसांनी बलात्काराचा आरोप लावून त्यास तुरूंगात पाठवले.

2009 मध्ये तुरूंगात राहून गोपाल  शेट्टे याने आपल्यावर झालेल्या अन्यायाबद्दल हायकोर्टात याचिका दाखल केली होती. या याचिकेचा निकाल 10 जून रोजी लागला. यामध्ये गोपाल शेट्टे यास निर्दोष सोडण्यात आले. परंतु, तब्बल 7 वर्षे तुरूंगात शिक्षा भोगून बाहेर आल्यानंतर त्याची पत्नी आणि मुले पूर्णपणे दुरावल्याचे त्याच्या लक्षात आले. त्याच्या पत्नीने दुसरे लग्न केले तर दोन मुलींना तिने अनाथालयात ठेवले आहे. त्याचप्रमाणे बलात्काराच्या गुन्ह्यात मुलाला अटक झाल्याचे वडिल रामदास यांना कळल्यानंतर त्यांचे हद‍्यविकाराच्या धक्क्याने निधन झाले.