Wed, Feb 26, 2020 09:48होमपेज › Mumbai-Thane-Raigad › मुंबईकरांसाठी तीन गुड न्यूज; प्रवास होणार अधिक जलद, सुखकर

मुंबईकरांसाठी तीन गुड न्यूज; प्रवास होणार अधिक जलद, सुखकर

Published On: Dec 11 2017 12:04PM | Last Updated: Dec 11 2017 12:07PM

बुकमार्क करा

मुंबई : पुढारी ऑनलाईन

वर्षातील 12 महिने गर्दीत प्रवास करणाऱ्या मुंबईकरांना एकाच दिवशी 3 गूड न्यूज मिळाल्या आहेत. या बातम्या नेमक्या काय आहेत. जाणून घ्या...   

लोकल, बेस्ट, मेट्रोचा प्रवास आता एकाच कार्डावर 

मुंबई महानगर क्षेत्रात प्रवाशांना एकाच कार्डद्वारे मेट्रो, बेस्ट आणि रेल्वे मार्गावर प्रवास करता यावा यासाठी एमएमआरडीएतर्फे लवकरच इंटीग्रेटेड कार्डाची सेवा सुरू कण्यात येणार आहे. या प्रणालीसाठी 25 डिसेंबरला निविदा काढण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. संपूर्ण बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा. 

गोरेगाहून लोकलने थेट पनवेलला जाणे आता शक्य 

हार्बर मार्गाचा लवकरच गोरेगावपर्यंत विस्तार होणार असल्याने सध्या अंधेरी ते पनवेल अशा चालणार्‍या फेर्‍या आता थेट गोरेगावहून सुरू करण्याचा रेल्वे प्रशासनाचा मानस आहे. त्यामुळे गाडी न बदलता पश्चिम उपनगरातील प्रवाशांना थेट नवी मुंबई-पनवेलला जाणे सहज शक्य होणार आहे. संपूर्ण बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा. 

बोरिवली ते वसईचा प्रवास होणार जलद

बोरिवलीपासून वसईकडे जाणार्‍यांचा प्रवास आता वेगवान होणार आहे. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाद्वारे (एमएमआरडीए) मीरा-भाईंदर- वसई- नायगाव जोडण्यासाठी पाच किलोमीटर लांबीचा पूल बांधण्यात येणार आहे. संपूर्ण बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.