Wed, Mar 27, 2019 03:58होमपेज › Mumbai-Thane-Raigad › पाटीदार समाजाला मंत्रिपद द्या

पाटीदार समाजाला मंत्रिपद द्या

Published On: Jan 30 2018 2:17AM | Last Updated: Jan 30 2018 1:42AMमुंबई : प्रतिनिधी

राज्यातील मंत्रिमंडळाच्या विस्तारावेळी लेवा पाटीदार समाजाला प्रतिनिधीत्व मिळावे  या मागणीसाठी सोमवारी लेवा पाटीदार समाजाच्यावतीने आझाद मैदानात  निदर्शने करण्यात आली. पाटीदार क्रांती दलाचा विजय असो, विजय असो, पाटीदार समाजाला मंत्रिपद मिळालेच पाहिजे,  मिळालेच पाहिजे,  एक क्रांती एक समाज पाटीदार समाज पाटीदार समाज, न्याय द्या न्याय द्या पाटीदार समाजाला न्याय द्या,  अरे आवाज दो हम एक है, अशा प्रकारच्या घोषणा देताना पाटीदार समाज बांधव दिसत होते. 

पाटीदार क्रांती दल ही महाराष्ट्रातील लेवा पाटीदार समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी स्थापन करण्यात आलेली संघटना आहे.  ही संघटना जळगाव, नाशिक, पुणे, मलकापूर, मुंबई, नवी मुंबई व ठाणे जिल्ह्यातील सुंपर्ण महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात कार्यरत आहे.  सन 2014 च्या लोकसभा व विधानसभा निवडणूकीत महाराष्ट्रातील पाटीदार समाज संपुर्णपणे भाजपाच्या पाठीशी उभा होता.  

आज समाजाचे एक खासदार व तीन आमदार आहेत, पण एकही मंत्री नाही. हा समाजावर अन्याय आहे,  मुख्यमंत्री देवेंद्र फणडवीस यांनी पाटीदार समाजाला प्रतिनिधीत्व द्यावे, अशी मागणी पाटीदार क्रांती दलाच्यावतीने मुख्यमंत्र्यांकडे करण्यात आलेली आहे , असे लेवा  पाटीदार समाजाचे संयोजक श्री. संजय बढे यांनी सांगितले.