Sat, Sep 22, 2018 05:20



होमपेज › Mumbai-Thane-Raigad › मुसलमानांनाही आरक्षण द्या, हायकोर्टात याचिका

मुसलमानांनाही आरक्षण द्या, हायकोर्टात याचिका

Published On: Mar 03 2018 1:46AM | Last Updated: Mar 03 2018 1:44AM



मुंबई : प्रतिनिधी

मराठा आरक्षणाचा मुद्दा उच्च न्यायालयात प्रलंबित असताना आता उच्च न्यायालयात मुस्लीम समाजामील काही जातीना आरक्षण द्या, अशी विनंती करणार्‍या याचिकेची उच्च न्यायालयाने दखल  घेतली. जमिती उलमा ए हिंद या सामाजिक संस्थेच्यावतीने अ‍ॅड. सतिश तळेकर यांनी दाखल केलेल्या याचिकेवर न्यायमूर्ती शंतनू केमकर आणि न्यायमूर्ती एम.एस. कर्णिक यांच्या खंडपीठाने  राज्य सरकारला या आठवड्यात  बाजू स्पष्ट करण्याचे आदेश दिले.

मराठा आरक्षणाचा मुद्दा उच्च न्यायालयात याचिका प्रलंबित असताना मुस्लीम समाजाने याचिका दाखल करून याला वेगळेच वळण आणले आहे. आरक्षणाच्या मुद्यावर राज्य सरकारने सेवानिवृत्त न्यायमूर्ती बापट यांच्या अध्यक्षतेखाली आयोगाचा स्थापना केली होती. या आयोगाने मराठा समाज आर्थिक, सामाजिक तसेच शैक्षणिकद‍ृष्ट्या मागास नसल्याने त्याना आरक्षणाची गरज नसल्याचा अहवाल देताना मुस्लीम समाजाला आरक्षण देण्याची शिफारस केली होती. त्या नुसार राज्य सरकारनेही आरक्षण देण्याचा निर्णय घेतला, मात्र त्याची अंमल बजावणी होत नसल्याने राज्य सरकारला आरक्षण देण्याचे आदेश द्या अशी विनंती केली आहे.