Thu, Aug 22, 2019 04:08होमपेज › Mumbai-Thane-Raigad › विज्ञान शिकवण्याआधी मूल्यशिक्षणाचे धडे द्या!

विज्ञान शिकवण्याआधी मूल्यशिक्षणाचे धडे द्या!

Published On: Jun 19 2018 1:31AM | Last Updated: Jun 19 2018 1:16AMमुंबई : प्रतिनिधी

अल्पवयीन मुलांवर होणार्‍या लैगिंग अत्याचाराच्या फोक्सो कायद्या अंतर्गत दाखल होणार्‍या गुन्ह्यात सुशिक्षिंताचे प्रमाणा अधिक असल्याने विज्ञान आणि तंत्रज्ञान शिकवण्याआधी विद्यार्थ्यांना मूल्यशिक्षणाचे धडे देण्याची गरज आहे, असे  मत उच्च न्यायालयाने व्यक्त केले. मुलांना आयुष्यात नितीमूल्यांची जाणीव नसेल तर डॉक्टर आणि इंजिनिअर होऊनही काही उपयोग नाही असेही न्यायमूर्ती नरेश पाटील आणि न्यायमूर्ती गिरीष कुलकर्णी यांच्या खंडपीठाने स्पष्ट केले.

पोक्सो कायद्याअंतर्गत चालवण्यात येणार्‍या खटल्यांकरता विशेष कोर्टाची स्थापना करण्यात यावी संदर्भात उच्च न्यायालयाने सुमोटो याचिका दाखल केली आहे. त्या याचिकेवर न्यायमूर्ती यायमूर्ती नरेश पाटील आणि न्यायमूर्ती गिरीष कुलकर्णी यांच्या खंडपीठासमोर सोमवारी सुनावणी झाली.यावेळी न्यायालयाने लहान मुलांवर होणार्‍या लैंगिक अत्याचाराबद्दल चिंता व्यक्त केली. पोक्सो अंतर्गत गुन्हे करणारे अनेक वेळा सुशिक्षितच असतात, असे मत व्यक्त करताना सुरूवातीपासूनच विद्यार्थ्थांना मुल्यशिक्षणाचे धडे देण्याची गरज असल्याचे मत व्यक्त केले. यावेळी राज्य सरकारच्यावतीने अ‍ॅडव्होकेट जनरल आशुतोष कुृंभकोणी यांनी सर्वाच्च न्यायालयाच्या मार्गदर्शनतत्वानुसार बालगुन्हेगारी रोखण्यासाठी विशेष दलाची स्थापना करण्यात आली असून दिल्लीप्रमाणे राज्यातील सत्र न्यायालयात चिल्डर्र्न फेंडली न्यायालयाची स्थापना करण्यात येणार असल्याची  माहिती न्यायालयाला दिली. तसेच काही स्वयंसेवी संघटनांच्या संपर्कात असून त्यांचाही सहभाग या मध्ये करून घेण्यात येणार आहे. या संबंधीचा अहवाल लवकरच न्यायालयात सादर केला जाईल, असेही अ‍ॅडव्होकेट जनरल आशुतोष कुृंभकोणी यांनी यावेळी न्यायालयाला सांगितले.