Mon, Jun 17, 2019 03:07होमपेज › Mumbai-Thane-Raigad › पीएम नोकरी द्या, काँग्रेसचे मंत्रालयाजवळ आंदोलन

पीएम नोकरी द्या, काँग्रेसचे मंत्रालयाजवळ आंदोलन

Published On: Feb 13 2018 2:23AM | Last Updated: Feb 13 2018 1:27AMमुंबई : प्रतिनिधी 

देशात दिवसेंदिवस बेरोजगारीचे प्रमाण वाढू लागले आहे. एका सर्व्हेक्षणानुसार देशात दररोज 550 जणांना रोजगार गमवावा लागतो. पुढील 2 वर्षांत तब्बल 65 टक्के जणांच्या नोकर्‍या जाण्याची भीती आहे, असे असताना पंतप्रधान व भाजपचे अध्यक्ष मात्र बेरोजगारांना भजी विक्री करण्याचा सल्ला देतात. याविरोधात मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरूपम यांच्या नेतृत्वाखाली सोमवारी दुपारी मंत्रालयाजवळील डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ आंदोलन करण्यात आले. मंत्रालयात जाण्याचा प्रयत्न करणार्‍या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले व काही वेळाने सोडून दिले. 

देशात 12 कोटी बेरोजगार आहेत. त्यांच्यासाठी रोजगार उपलब्ध करून देण्याऐवजी भजी विकण्याचा सल्ला दिला जात आहे. बेरोजगारांचा हा अपमान आहे. मोदी सरकारने देशाची अर्थव्यवस्था बरबाद केली आहे. देशातील सर्व बेरोजगारांनी भजी विकायला सुरूवात केली तर काय परिस्थिती होईल याचा सरकारने विचार केला आहे की नाही असे निरूपम म्हणाले.