Sun, Aug 18, 2019 20:59होमपेज › Mumbai-Thane-Raigad › सीबीएसई बारावी परीक्षेत मुलींची बाजी

सीबीएसई बारावी परीक्षेत मुलींची बाजी

Published On: May 27 2018 1:47AM | Last Updated: May 27 2018 1:47AMमुंबई : प्रतिनिधी

दिल्लीच्या सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशन (सीबीएसई) मंडळाच्या बारावीचा निकाल जाहीर झाला असून सीबीएसईने जाहीर केलेल्या पहिल्या सात विद्यार्थ्यांच्या यादीत यंदा महाराष्ट्रातील एकाचाही समावेश नाही. देशाचा एकूण निकाल 83.01 टक्के लागला आहे. गेल्यावर्षी 82.02 टक्के इतका होता. देशभरातील निकालात यंदा मुलींनीच बाजी मारली असून नोयडाची मेघना श्रीवास्तव देशात पहिली आली आहे. नोएडाच्या मेघना श्रीवास्तव 499 गुण मिळवित देशात पहिली आली आहे.

बारावी परीक्षेचा निकाल शनिवारी ऑनलाइन जाहीर करण्यात आला. गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा केवळ 1 टक्के निकालात वाढ झाली आहे. 5 मार्च ते 27 एप्रिलदरम्यान देशभरातील 4 हजार 145 केंद्रांवर ही परीक्षा घेण्यात आली होती. 11 हजार 510 शाळांधील 11 लाख 6 हजार 772 विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली. यापैकी 9 लाख 18 हजार 763 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.

नोयडा येथील ताज एक्सप्रेस रोडवरील स्टेप बाय स्टेप शाळेतील मेघना श्रीवास्तव हिने99.8 टक्के गुण मिळाले आहेत. इंग्रजी वगळता तिला सर्व विषयांध्ये100 पैकी 100 गुण मिळाले आहेत. तर इंग्रजीमध्ये तिला 99 गुण मिळाले. गाझियाबाद येथील अनुष्का चंद्रा हिला मेघनापेक्षा केवळ 1 गुण कमी मिळाला असून ती 99.6 टक्के गुणांसह देशात दुसरी आली आहे. तिसर्या क्रमांकावर सात जण असून त्यांना प्रत्येकी 497 म्हणजे99.4 टक्के गुण मिळाले आहेत. चाहत बोधराज, आस्था बाम्बा, तनुजा काप्री, सुप्रिया कौशिक, नकुल गुप्ता, क्षितीज आनंद व अनन्या सिंग अशी त्यांची नावे आहेत. मुलींनीच या निकालात वर्चस्व मिळवले आहे.

88.31 टक्के मुली उत्तीर्ण झाल्या असून, मुलांची उतीर्णटक्केवारी 78.99 इतकी आहे. या मध्ये 9.32 टक्क्यांचा फरक आहे. त्रिवेंदमचा निकाल सर्वाधिक म्हणजे 97.32 टक्के लागला आहे. त्यापाठोपाठ महाराष्ट्राचा समावेश असलेल्या चेन्नई विभागाने बाजी मारली असून चेन्नई विभागाचा निकाल यंदा 93.87 टक्के लागला आहे. गेल्यावर्षी चेन्नईचा निकाल 92.60 टक्के होता. तर तिसर्‍या स्थानावर दिल्ली विभाग असून या विभागाचा निकाल 89 टक्के इतका आहे. परदेशी विद्यार्थीही आघाडीवर आहेत. 15 हजार 674 परीक्षा दिलेल्या पैकी 14 हजार 881 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. त्यांची टक्केवारी 94.94 टक्के इतकी आहे. हा टक्केवारीचा गतवर्षी 92.02 टक्के इतका होता.