Wed, Jul 24, 2019 12:23होमपेज › Mumbai-Thane-Raigad › शीतपेयातून गुंगीचे औषध पाजून प्रेयसीवर बलात्कार

शीतपेयातून गुंगीचे औषध पाजून प्रेयसीवर बलात्कार

Published On: Apr 17 2018 2:26AM | Last Updated: Apr 17 2018 2:00AMमुंबई : प्रतिनिधी

शीतपेयातून गुंगीचे औषध देऊन एका 25 वर्षांच्या तरुणीवर बलात्कार करुन तिचे अश्‍लील व्हिडीओ काढून सोशल साईटवर व्हायरल करण्याची धमकी प्रियकराने दिल्याची घटना पायधुनी परिसरात उघडकीस आली आहे. तसेच लग्नासाठी पावणेतीन लाखांचे सोन्याचे दागिने आणि कॅश घेऊन तिची प्रियकराच्या आईसह भावाने फसवणुकही केली असून याप्रकरणी तिन्ही आरोपींविरुद्ध पायधुनी पोलिसांनी फसवणुक, बलात्कार आणि धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा नोंदविला आहे. 

गुन्हा दाखल होताच सरदार शब्बीर हुसैन या 36 वर्षीय प्रियकराच्या भावाला पोलिसांनी अटक केली आहे. अटकेनंतर त्याला येथील लोकल कोर्टाने 19 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या गुन्ह्यांत प्रियकर इसरार खान ऊर्फ अल्लाबक्ष गौसपीर आणि त्याची आई जाहिदा गौसपीर हे दोघेही सहआरोपी असून त्यांच्या अटकेसाठी पायधुनी पोलिसांचे एक विशेष पथक कर्नाटक येथे पाठविण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. 

मुंब्रा येथे राहणारी ही तरुणी 25 वर्षांची असून तिची सहा वर्षांपूर्वी फेसबुकवरुन आरोपी इसरारशी ओळख होऊन ते दोघेही चांगले मित्र झाले. याच दरम्यान ते मुंब्रा रेल्वे स्थानकात भेटले. यावेळी इसरारने त्याचे खरे नाव अल्लाबक्ष गौसपीर असल्याचे सांगून तो तिच्यावर प्रेम करतो, तसेच तिला लग्नाची मागणी घातली होती. तिनेही त्याला होकार दिला होता.

काही महिन्यांपूर्वी तो तिला न सांगता त्याच्या कर्नाटक येथील गावी निघून गेला होता, यावेळी तिने त्याला फोन करुन तिचे लग्न ठरले आहे, मात्र त्याने तिला लग्न करु नकोस, आपण लवकरच लग्न करू असे सांगितले. त्यानंतर ती त्याच्या कर्नाटक येथील गावी गेली होती. यावेळी त्याची आई जाहिदा आणि भाऊ सरदार या दोघांनी दोघांच्या लग्नासाठी तिच्याकडून 102 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने आणि पन्नास हजार रुपयांची रोकड असा पावणेतीन लाख रुपये घेतले होते. मात्र हा ऐवज घेतल्यानंतरही इसरारने तिच्याशी लग्नास नकार दिला होता. तसेच तिचे ठरलेले लग्नही तिला मोडण्यास भाग पाडले.  

या घटनेनंतर या तरुणीने पायधुनी पोलिसांना घडलेला प्रकार सांगून या तिघांविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर इसरार खान ऊर्फ अल्लाबक्ष गौसपीर, त्याची आई जाहिदा गौसपीर आणि भाऊ सरदार हुसैन या तिघांविरुद्ध पोलिसांनी 376, 420, 506, 34 भादवी कलमांतर्गत गुन्हा नोंदविला होता. याच गुन्ह्यांत पायधुनी पोलिसांनी शनिवारी सरदार हुसैनला अटक केली आहे. सध्या तो पोलीस कोठडीत असून इतर दोघांच्या अटकेसाठी पायधुनी पोलिसांचे एक विशेष पथक कर्नाटकला गेले आहे. 

चार वर्षांपूर्वी ते दोघेही पायधुनीतील एका मित्राच्या घरी भेटले होते. यावेळी त्याने तिला पेप्सीतून गुंगीचे औषध दिले आणि तिच्यावर बलात्कार केला होता. या शारीरिक संबंधाचे त्याने त्याच्या मोबाईलवरुन एक व्हिडीओ काढला होता. शुद्धीवर आल्यानंतर तिला हा प्रकार समजताच त्याने तिला धमकी दिली होती. घडलेल्या प्रकाराची कुठेही वाच्छता करु नकोस, नाहीतर तुझा व्हिडीओ व्हायरल करु, जेणेकरुन तिचीच बदनामी होईल असे सांगितले होते. या घटनेनंतर सलग चार वर्षांपासून तो तिच्यावर जबरदस्ती करीत होता. पायधुनी आणि कल्याण येथील विविध लॉजमध्ये त्याने तिच्यावर बलात्कार केला होता. 

Tags : Mumbai, Girlfriend, raped , Mumbai news,