Sun, May 26, 2019 12:36होमपेज › Mumbai-Thane-Raigad › गुंगीच्या गोळ्या देऊन मुलीवर अत्याचार

गुंगीच्या गोळ्या देऊन मुलीवर अत्याचार

Published On: Jan 29 2018 1:30AM | Last Updated: Jan 29 2018 12:45AMनालासोपारा : वार्ताहर

एका नराधमाने आपल्या मित्राच्या मुलीला गुंगीच्या गोळ्या देऊन तिच्यावर वारंवार अत्याचार केल्याची धक्कादायक घटना वालीव पोलीस ठाण्याच्या हद्दीत उघडकीस आली आहे. या अत्याचारामुळे कुमारी माता बनण्याची नामुष्की ओढवलेल्या पीडितेवर तिच्या प्रसुतीनंतरही अत्याचार करण्याचा प्रयत्न आरोपीने केला. तिने याबाबत तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी आरोपीच्या मुसक्या आवळल्या.

वसईतील भोयदापाडा येथे एक मजूर आपल्या मुलीला डोकेदुखीचा त्रास होतो म्हणून उपचारासाठी मुंबईला घेऊन गेला. यावेळी त्याचा मित्र असलेल्या आरोपीने मी तिच्यावर उपचार करतो, असे सांगितले. त्यानंतर गुंगीच्या गोळ्या देऊन उपचाराच्या नावाखाली तिच्यावर वारंवार अत्याचार केला. तसेच याबाबत कोणाकडे वाच्यता केल्यास तुझ्या वडिलांना मारून टाकेन, अशी धमकीही त्याने पीडितेला दिली. यानंतर ती गरोदर राहिल्याने तिच्या वडिलांनी वालीव पोलीस ठाण्यात धाव घेऊन आरोपीविरोधात तक्रार दाखल केली.

गेल्या वर्षी 15 डिसेंबर रोजी पीडितेने एका बाळाला जन्म दिला. आरोपी पीडितेला औषधोपचाराचा खर्च देत नव्हता. त्यामुळे मानवाधिकार संस्थेचे राजसिंग यांच्याकडे पीडितेचे नातेवाईक आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय हजारे यांनी बलात्कार,धमकावल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला. दरम्यान, दोन दिवसांपूर्वी (शुक्रवारी) रात्री 12 च्या सुमारास आरोपीने पुन्हा पीडितेच्या घरी येऊन तिच्यावर अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. यावेळी पीडितेने आपली कशीबशी सुटका करून बाहेरून कडी लाऊन आरोपीला कोंडले. त्यानंतर बाजूला राहणार्‍या सीमा सिंग या महिलेला सर्व हकीगत सांगितली. त्यानंतर त्यांनी आरोपीला चांगलाच चोप देऊन सोडून दिले. तसेच मानवाधिकारचे राजसिंग यांच्या मदतीने  वालीव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. पोलिसांनी आरोपीला अटक केली असून त्याला वसई न्यायालयाने 30 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी दिली आहे.