Wed, Nov 14, 2018 13:08होमपेज › Mumbai-Thane-Raigad › लग्नाची बोलणी करायला बोलावून तरुणीला लुटले

लग्नाची बोलणी करायला बोलावून तरुणीला लुटले

Published On: Dec 29 2017 11:32AM | Last Updated: Dec 29 2017 11:32AM

बुकमार्क करा
मुंबई : प्रतिनिधी

विवाह जुळविणार्‍या एका प्रसिद्ध ऑनलाईन साईटवरुन 30 वर्षीय तरुणीशी ओळख करत लग्नाची बोलणी करण्याच्या बहाण्याने भेटायला बोलावून ठगाने लुटल्याचा धक्कादायक प्रकार सांताक्रुझमध्ये उघडकीस आला आहे. कृष्णा कदम असे या ठगाचे नाव असून फसवणुकीचा गुन्हा दाखल करत सांताक्रुझ पोलिसांनी त्याचा शोध सुरू केला आहे.

सांताक्रुझ पश्‍चिमेकडील भारत सेवा संघ गल्ली परिसरात सदर तरुणी कुटुंबासोबत राहाते. तिने विवाह जुळविणार्‍या साईटवर आपले प्रोफाईल बनवले आहे. याच साईटवर कदम यानेसुद्धा स्वत:चे प्रोफाईल बनवून या तरुणीसोबत ओळख वाढविली. याच ओळखीतून 10 जून रोजी लग्नाची बोलणी करण्यासाठी कदमने या तरुणीला सांताक्रुझ स्थानकाजवळ बोलावले. तरुणीला विश्‍वासात घेत, तिने अंगावर घातलेले सोन्याचे दागिने आणि मोबाईल एका पिशवीत काढून ठेव, असे कदमने तिला सांगितले. त्याच्यावर विश्‍वास ठेवत तरुणीने आपल्या अंगावरील पिशवीमध्ये दागिने ठवले. 32 हजार रुपये किंमतीचे दागिने असलेली ही पिशवी घेऊन तिकीट काढण्यासाठी गेलेला कदम परतलाच नाही. तब्बल पाच महिने त्याची वाट बघितल्याने आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच तरुणीने 24 डिसेंबर रोजी सांताक्रुझ पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली.