Sat, Feb 23, 2019 10:07होमपेज › Mumbai-Thane-Raigad › घरकुल योजनेत ठाणे जिल्हा राज्यात प्रथम

घरकुल योजनेत ठाणे जिल्हा राज्यात प्रथम

Published On: Jan 02 2018 1:50AM | Last Updated: Jan 02 2018 12:41AM

बुकमार्क करा
ठाणे : राहुल क्षीरसागर

ठाणे जिल्ह्यात प्रधानमंत्री आवास योजना राबविण्यात येत आहे. या योजनेअंतर्गत सन 2016 - 17 मध्ये देण्यात आलेल्या उद्दीष्टापैकी 62 टक्के काम पुर्ण करीत ठाणे जिल्ह्याने राज्यात प्रथम क्रमांक पटकाविला आहे. सर्वाधिक घरे ही भिवंडी तालुक्यात बांधण्यात आली आहे.

घरकुल योजनेतंर्गत गोरगरीब जनतेला हक्काची घरे मिळणार आहेत. योजनेच्या मार्गदर्शक सूचीमध्ये झोपडपट्ट्यांचा आहे तिथेच पुनर्विकास करणे, आर्थिकदृष्ट्या दुर्बल व अल्प उत्पन्न गटातील घटकांसाठी कर्ज संलग्न व्याज अनुदानाच्या माध्यमातून घरांची निर्मिती, खासगी भागीदारीद्वारे घरांची निर्मिती व आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी लाभार्थ्यांना घरकूल बांधकामासाठी अनुदान आदींचा समावेश आहे.

2016 - 17 साठी शासनाच्या वतीने जिल्ह्यातील पाच तालुक्यांसाठी तीन हजार 399 घरकुलांचे उद्दीष्टे देण्यात आले होती. त्यापैकी 2 हजार 116 घरकुल पुर्ण करीत राज्यात प्रथम क्रमांक पटकाविला आहे. त्यापाठोपाठ सातारा जिल्ह्याने दुसरा तर, नाशिक जिल्ह्याने तिसरा क्रमांक पटकाविला आहे. तसेच सन 2017 - 18 मध्ये 721 लाभार्थ्यांपैकी 690 लाभार्थ्यांना पहीला हप्ता देण्यात आला आहे. सन 2016 - 17  मध्ये 3 हजार 393 लाभार्थ्यांना पहिला हप्ता देण्यात आला असून दोन हजार 977 लाभार्थ्यांना दुसरा हप्ता देण्यात आला असल्याची माहिती प्रकल्प संचालक डॉ. रुपाली सातपुते यांनी बोलताना दिली.