Tue, Jul 16, 2019 22:07होमपेज › Mumbai-Thane-Raigad › मुंबईचे राजे वाजतगाजत आले!

मुंबईचे राजे वाजतगाजत आले!

Published On: Sep 09 2018 2:30AM | Last Updated: Sep 09 2018 2:30AMमुंबई : तन्मय शिंदे

गणेशोत्सव काही दिवसांवर आल्यामुळे शहरातील अनेक गणेशमंडळांच्या लाडक्या गणरायांचे ढोल ताशा गजरात आणि म्युझीकल वाद्यांच्या ठेक्यात शनिवारी उत्साहात आगमन झाले. अनेक मोठ्या मंडळांच्या गणपतींसोबत चिंचपोकळीतील मानाच्या चिंतामणीचा आगमन मिरवणूक सोहळ्यात शहर, उपनगर, ठाणे, कल्याण, नवी मुंबईमधील तरुणांच्या जल्लोषाला उधाण आले होते.

आगमन सोहळ्यामुळे प्रचंड वाहतूक कोंडीला मुंबईकरांना सामोरे जावे लागत होते. संपूर्ण बी. ए. मार्ग, गं. द. आंबेकर मार्गावर वाहतूक कोंडी समस्या जाणवत असून वाहतूक पोलिसांकडून वाहनांची गर्दी कमी करण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरु होते. ढोल ताशांचा गजर आणि त्यावर गणेश भक्तांनी धरलेला ताल यामुळे संपूर्ण वातावरण भक्तीमय झाले आहे. परळ वर्क शॉपमधून तब्बल 32 गणरायांचे तर विजय  खातू यांच्या कार्यशाळेतून 10 गणरायांचे ढोलताशाच्या गजरात व गणपतीबाप्पा मोरयाच्या जयघोषात भक्तीमय वातावरणात आगमन सोहळे सुरू झाले. गणेश मंडळांच्या आगमन सोहळ्यात अबाल वृद्धांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती असली तरी चिंतामणीच्या आगमन सोहळ्यात तरुणांचा उत्साहाला उधाण आले होते. तरुणाईने आगमन सोहळ्यात ढोलताशाच्या ठेक्यावर ताल धरला. आगमन मिरवणूकीमुळे संपुर्ण बी ए रोडवर सकाळपासून वाहतूक कोंडीची समस्येला मुंबईकरांना सामोरे जावे लागले.

 चिंचपोकळीच्या चिंतामणीचा आगमन सोहळ्यास सुरूवात झाल्यावर आपल्या लाडक्या बाप्पाच्या आगमन सोहळ्यात मुंबईकरांची प्रचंड मोठी गर्दी झाली आहे. विशेषत: या मिरवणूकीत तरुणाची मोठा सहभाग आहे. मूर्तीकार रेश्मा खातू यांच्या गणेश चित्र शाळेतून शनिवारी दुपारी  चिंचपोकळीच्या चिंतामणीची आगमन मिरवणूक निघाली आहे. चिंतामणीचे हे 99 वर्ष आहे. त्यामुळे यंदा चिंतामणीच्या पुजेचा मान हा मुंबई पोलिसांना देण्यात आला. आगमनात तरुणाईच्या जल्लोषाला उधाण आले आहे.