Mon, Mar 25, 2019 09:18होमपेज › Mumbai-Thane-Raigad › गँगस्टर फरीद तनाशा हत्या : ६ जणांना जन्मठेप

गँगस्टर फरीद तनाशा हत्या : ६ जणांना जन्मठेप

Published On: May 31 2018 1:42AM | Last Updated: May 31 2018 12:51AMमुंबई : प्रतिनिधी

अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजनचा हस्तक फरीद तनाशा याच्या हत्येप्रकरणी विशेष मोक्का न्यायालयाने सात वर्षानंतर 11 जणांना दोषी ठरविले. मोक्का न्यायालयाचे न्यायाधिश एस. एम. भोसले यांनी सहाजणांना जन्मठेप तर पाच जणांना 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा ठोठावली.

अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजनच्या हस्तक फरीद तनाशा याची चेंबूरमधील एका रिअल इस्टेटच्या वादातून 2 जून 2010 रोजी चेंबूरमधील टिळक नगर परिसरात त्याच्या घरातच दिवसाढवळ्या गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. याप्रकरणी पोलिसांनी 11 जणांना अटक  करून त्यांच्या विरोधात मोक्का कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला होता. न्यायाधीश एस.एम. भोसले यांच्या समोर सुनावणी झाली. यावेळी सरकारी वकिलांनी ही हत्या रिअल इस्टेटच्या वादातून हत्या झाली असा दावा केला.

चेंबूरमधील बिल्डर दत्तात्रय भाकरे यांनी विकास करण्यासाठी घेतलेल्या भूखंडाला स्थानिक रहिवाशांनी विरोध केला. काही सभासदांनी फरीद तनाशा याची मदत घेतल्याने दत्तात्रय भाकरे यांनी भरत नेपाळी या गँगस्टरला 90 लाखांची सुपारी देऊन फरीदची हत्या केल्याचा दावा केला होता. तसे पुरावे न्यायालयात सादर केले. याची दखल घेऊन न्यायालयाने सहा  जणांना जन्मठेप आणि पाचजणांना 10 वर्षे कारावासाची शिक्षा ठोठावली.