Fri, Jul 19, 2019 16:47होमपेज › Mumbai-Thane-Raigad › गँगस्टर अबू सालेमने धाडली ‘संजू’च्या निर्मात्यांना नोटिस 

गँगस्टर अबू सालेमने धाडली ‘संजू’च्या निर्मात्यांना नोटिस 

Published On: Jul 27 2018 9:14AM | Last Updated: Jul 27 2018 10:30AMमुंबई : पुढारी ऑनलाईन 

अभिनेता संजय दत्त याच्या जीवनावर आधारीत ‘संजू’ हा चित्रपट काही आठवड्यापूर्वी प्रदर्शित झाला होता. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई करत असतानाच या चित्रपटाला मुंबईतील तुरुंगातून आक्षेप घेण्यात आला आहे. 

मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणी शिक्षा भोगत असलेला कुख्यात गँगस्टर अबू सालेमने संजू चित्रपटाच्या निर्मात्यांना कायदेशीर नोटिस बाजवली आहे. सालेमने या नोटिसमध्ये संजू चित्रपटात त्याच्याविषयी चुकीची माहिती दिल्याचा दावा केला आहे. त्याने या या प्रकरणी निर्मात्यांनी त्याची माफी मागावी अशी मागणी केली आहे. जर १५ दिवसात उत्तर दिले नाही तर अबू सालेमने मानहानीचा दावा ठोकण्याची धमकीही दिली आहे. 

संजू चित्रपटाबाबत आकक्षेप घेणारा अबू सालेम हा पहिला व्यक्ती नाही. याआधी प्रसिध्द अभिनेत्री माधुरी दीक्षितनेही चित्रपटातील काही दृष्यांवर आक्षेप घेतला होता आणि ही दृष्ये चित्रपटातून हटवण्यास सांगितली होती.