होमपेज › Mumbai-Thane-Raigad › मुंब्य्रातील युवतीवर दिव्यात सामूहिक अत्याचार

मुंब्य्रातील युवतीवर दिव्यात सामूहिक अत्याचार

Published On: Apr 14 2018 1:41AM | Last Updated: Apr 14 2018 12:52AMठाणे : प्रतिनिधी

मुंब्रा येथे राहणार्‍या एका 20 वर्षीय युवतीवर दिव्यात सामूहिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पीडित युवती कामावरून घरी येताना दोघा तरुणांनी घरी सोडण्याच्या बहाण्याने तिला रिक्षात बसवून दमदाटी करीत दिवा येथील बंद खोलीत नेऊन अत्याचार केल्याची तक्रार पीडितेने मुंब्रा पोलिसात केली आहे. ही घटना सोमवारी दुपारी घडली. याप्रकरणी मुंब्रा पोलिसांनी दोघा तरुणावर गुन्हा दाखल केला असून दोघांचा शोध सुरु आहे.

मुंब्रा येथून दिवा येथे कामावर गेलेल्या पीडित युवती सोमवारी 9 एप्रिलला दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास कामावरून सुटल्यावर रिक्षाची वाट पाहत उभी होती. तेव्हा पीडित युवतीच्या पाळतीवर असलेल्या तिच्या परिचयातील विशाल व रोशन या नराधमांनी रिक्षात बसण्याचा आग्रह धरला. तसेच घरी सोडण्याचे आमिष दाखविले. पीडित युवती रिक्षात बसल्यावर दमदाटी करीत दोघांनी तिला दिवा येथील बी.आर.नगर येथील बंद खोलीत नेऊन तिच्यावर आळीपाळीने अत्याचार केला. पीडितेने कशीबशी आपली सुटका करीत आपले घर गाठून घडलेल्या प्रकाराची माहिती आपल्या पालकांना दिली. या घटनेप्रकरणी गुरुवारी 12 एप्रिलला मुंब्रा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून पोलीस त्या दोघा नराधमाचा शोध घेत आहेत.

Tags : Mumbai, Gang, Rape, woman,  Mumbra