Tue, Apr 23, 2019 21:34होमपेज › Mumbai-Thane-Raigad › गणेश मंडळांना सर्व परवानग्या यंदा एकाच अ‍ॅपवर

गणेश मंडळांना सर्व परवानग्या यंदा एकाच अ‍ॅपवर

Published On: May 08 2018 1:56AM | Last Updated: May 08 2018 1:56AMमुंबई : प्रतिनिधी

यंदाचा गणेशोत्सव दि. 13 सप्टेंबरपासून सुरू होत आहे. गणेशोत्सव मंडळांना उत्सव साजरा करण्यासाठी ज्या विविध परवानग्यांची गरज असते त्या सर्व  परवानग्या महापालिकेच्या एकाच अ‍ॅपवर आता मिळणार आहेत. 

मुंबई शहराचे पालकमंत्री सुभाष देसाई यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या गणेशोत्सव पूर्वतयारीच्या बैठकीत ही माहिती देण्यात आली. गणेश आगमन व विसर्जन यासाठी दरवर्षी जे मार्ग वापरले जातात त्यामध्ये काही अडथळे असल्यास ते प्राधान्याने दूर करण्याचे आदेश  देसाई  यांनी दिले. 

मुंबई शहर व उपनगरात मेट्रोच्या कामामुळे या उत्सवात कोणताही अडथळा येऊ नये याची काळजी घेऊन येत्या दि. 15 ऑगस्टपूर्वी सर्व कामे पूर्ण करावीत. महापालिका, पोलीस प्रशासन, एमएमआरडीए व सर्व संबंधित विभागांनी परस्परांत समन्वय ठेऊन गणेशोत्सवाच्या  नियोजनाची तयारी करावी अशा सूचनाही देसाई यांनी दिल्या. 

यावेळी मुंबईच जिल्हाधिकारी शिवाजी जोंधळे,  वाहतूक विभागाचे उपायुक्त  अशोक दुधे, नरेंद्र बर्डे, मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनचे ज्येष्ठ उपमहाव्यवस्थापक डी. एस.चिंचोलीकर, महापालिका मंडळ समन्वयक खंडागळे, उपायुक्त दीपक देवळे, कार्यकारी  अभियंता व्ही. एम. शेवडे, मिहिर  कुलकर्णी यांच्यासह बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव  समन्वय समितीचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.

Tags : Mumbai, mumbai news, Ganesh Mandal,  permission, same app,