Thu, Apr 25, 2019 05:59होमपेज › Mumbai-Thane-Raigad › नाट्यगृह देखभालीचा निधी उभारा

नाट्यगृह देखभालीचा निधी उभारा

Published On: Jun 14 2018 1:34AM | Last Updated: Jun 14 2018 1:16AMप्रियदर्शनी क्रीडा संकुल, कालीदास नाट्य मंदिर, सुधा करमरकर रंगमंच मुलुंड - अनुपमा गुंडे 
मल्टीप्लेक्सला 5 वर्षांचा कर माफ आहे, आपल्याकडे नाट्यगृह बांधण्याची ऐपत फक्त नगरपालिकांकडे, महापालिकांकडे आहे, ते नाट्ट्यगृह बांधून मोकळे होतात. आपल्या सगळ्या नाट्यगृहाच्या  देखभालीसाठी निधीची गरज आहे, नाट्यगृहांच्या देखभालीसाठी प्रत्येक आसनामगो 1 रूपयो गोळा केला, तर नाट्यगृहांच्या देखभालीचा निधी उभा राहू शकतो,असा निधी उभा राहिला तरच नाट्यगृहांची काळजी घेतली जाईल, असे मत व सूचना ज्येष्ठ नाटकाकर सतीश आळेकर यांनी केली. 

मुलुंड येथील प्रियदर्शनी क्रीडा संकुलात बुधवारपासून सुरू झालेल्या 98 व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचे उद्घाटन आळेकर यांच्या हस्ते करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते. 1990 च्या आर्थिक उदारीकरणानंतर खुप बदल झाले. उदारीकरणाला 25 वर्षे झाली, दोन पिढ्या झाल्या. या आर्थिक उदारीकरणाचा काय फायदा नाटकाला झाला, असा सवाल करून आळेकर म्हणाले,, माझ्या मते नाटकांमुळे 3 गोष्टी घडतात. नाटक ही करमणूक आहे, नाटकातून एखादा विचार झिरपत जातो, तसेच तिसरी गोष्ट म्हणजे नाटक कुठल्याही प्रकारचे असो, त्यातून धंदा व्हायला हवा, हा धंदा झाला नाहीतर ही कला पुढे रेटणार कशी, असा प्रश्न त्यांनी उपस्थितीत केला. 

आर्थिक उदारीकरणाच्या काळात धंद्याला भांडवल पुरविण्याची जबाबदारी केवळ तिकिट काढून येणार्या प्रेक्षकांची आहे का, आर्थिक उदारीकरणाचा फायदा ज्या उद्योगांना झाला, त्यांची यात काही जबाबदारी नाही का. याचा विचार नाट्यपरिषदेने करावा, अशी सूचना त्यांनी केली. नाटकाला कर नाही, यशवंतराव चव्हाण यांनी हा कर माफ केला, ती एक मोठी सबसिडी शासनाने दिली आहे. आता नाटक हा शब्द राहिला नाही, त्या एटंरटेनमेंट इंडस्ट्री म्हटले जाते, या इंडस्ट्रीत 15. 20 कोटींची उलाढाल आहे यातल्या मनुष्यबळाला कसे प्रशिक्षित करणार, असा सवाल त्यांनी केला. उच्चशिक्षण कात्रीत अडकले आहे, खरे तर सायन्स नंतर विद्यार्थ्यांचा कल विविध कलांकडे आहे, पण आज आपल्याकडचे उच्चशिक्षण कात्रीत सापडले आहे, अशी खंत त्यांनी व्यक्त केली.

डॉ. आंबेडकर विद्यापीठांचा नाट्य विभाग सोडला तर इतर विद्यापीठांचे नाट्य विभागात विना अनुदानित तत्वावर सुरू आहेत, या विभागांना अनुदानासाठी असंख्य वेळा अर्ज करून झाले आहेत, मोठ्या प्रमाणात तरूण या प्रायोगिक कलांकडे आकर्षित होत असतील, तर त्यांना आयआयटीच्या दर्जाचे शिक्षण देण्याची जबाबदारी कुणाची आहे, असा सवाल त्यांनी केला. या कलांचे दर्जेदार शिक्षण विद्यार्थ्यांना मिळाले नाही तर आपली रंगभूमी केवळ हौशी रंगभूमीच राहिल, अशी भीती त्यांनी व्यक्त केली. नाटक हा धंदा प्रशिक्षित रूपात चालविणार रघुवीर खेडेकर आणि मंगला बनसोडे हे दोन ग्रुपच करतात, रघुवीर खेडेकर यांच्याकडून व्यवस्थापन कला शिकण्यासाऱखी आहे, हे आपल्या तरूण विद्यार्थ्यांपर्यंत पोहचले पाहिजे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. रंगभूमीच्या ताणतणावांच्या प्रश्‍नाबांबत शिबिरे घ्यावीत, असे सूचना त्यांनी केली.