Fri, Apr 26, 2019 19:54होमपेज › Mumbai-Thane-Raigad › लटकाना, अटकाना, भटकाना हेच काँग्रेसचे कल्चर : PM मोदी

लटकाना, अटकाना, भटकाना हेच काँग्रेसचे कल्चर : PM मोदी

Published On: Feb 18 2018 5:53PM | Last Updated: Feb 18 2018 5:53PM मुंबई : पुढारी ऑनलाईन 

 नवी मुंबईतील आंतरराष्टीय विमानतळ आणि जेएनपीच्या चौथ्या टर्मिनलचे रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते उद्धाटन करण्यात आले. यावेळी मोदींनी  नाव न घेता काँग्रेसवर निशाणा साधला. मोदी म्हणाले की,  गेल्या २० वर्षांत अनेक प्रकल्पांना मंजूरी मिळाली. पण मागील सरकारच्या निष्क्रियतेमुळे कोणताही प्रकल्प मार्गी लागला नाही. 

माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांनी १९९७ मध्ये मुंबईच्या विकासाचे  स्वप्न पाहिले होते. पंतप्रधान पदाची सुत्रे हाती घेतल्यानंतर त्यांचे स्वप्न पूर्ण करुन सामान्य नागरिकांना हवाई सफर करता यावी, या विचाराने  धूळ खात पडलेल्या फाईलीवर अभ्यास केला. प्रगती नावाचा कार्यक्रमात अडखळलेल्या प्रकल्पांविषयी अधिकाऱ्यांसोबत स्व:ता चर्चा करुन प्रकल्प मार्गी लावण्याचा कार्यक्रम सुरु केला आहे, असे ते म्हणाले. 

हे प्रकल्प आमच्या काळात मंजूर झाले होते असा सूर उद्या ऐकायला मिळेल, असे सांगत त्यांनी विरोधकांना धारेवर धरले. ते म्हणाले की, काँग्रेसच्या 'लटकाना, अटकाना, भटकाना या वृत्तीमुळे प्रकल्प अडखळले. त्यांनी निर्माण केलेले कल्चर बदलण्यासाठी आम्ही काम करत असून लवकरच रखडलेले प्रकल्प मार्गी लावू, असे आश्वासनही त्यांनी दिले.

याशिवाय शिव स्मारकाचे काम लवकरात लककर पूर्ण करण्यावर भर देणार असल्याचे त्यांनी सांगितले. छत्रपती शिवाजी महाराजांना प्रणाम करत त्यांनी मराठी भाषेत आपल्या भाषणाला सुरुवात केली. यावेळी त्यांनी शिवाजी महाराजांच्या सामरिक शक्ती आणि दूरदृष्टीचं स्मरणही करुन दिले.