होमपेज › Mumbai-Thane-Raigad › मनातला संताप विसरू नका : राज यांचे लाँग मार्चला आवाहन 

मनातला संताप विसरू नका : राज यांचे लाँग मार्चला आवाहन 

Published On: Mar 12 2018 1:23AM | Last Updated: Mar 12 2018 11:08AMमुंबई : खास प्रतिनिधी

या सरकारकडून तुमचे काहीही भले होणार नाही, त्यासाठी एकदा माझ्या हातात सत्ता द्या आणि मग पहा तुमच्या सगळ्या मागण्यांना कसा न्याय देतो, अशा शब्दात मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज शेतकरी मोर्चाला सामोरे जाऊन केले. मात्र आज तुमच्या पायाला आलेले फोड आणि वेदना कधीच विसरू नका, तुमच्यातला हा अंगार जागता ठेवा असे आवाहन करताना  शेतकर्‍यांच्या या आंदोलनाला मनसेचा पूर्ण पाठिंबा असल्याचे त्यांनी जाहीर केले.

राज यांनी आज सोमय्या मैदानात जाऊन मोर्चेकरी शेतकर्‍यांची भेट घेतली. अजित नवले, ढवळे,गावित शेकापचे आमदार जयंत पाटील आदि नेत्यांशी त्यांनी चर्चा केली. त्यानंतर शेतकर्‍यांना संबोधित करताना राज यांनी सरकारवर कडवट शब्दात टिका केली. शेतकरी हे मराठी आहेत आणि ते कोणत्या झेंड्याखाली एकत्र आलेत यापेक्षा त्यांच्या समस्या कोणत्या आहेत याकडे आपण पहात आहोत, असे ते म्हणाले. या सरकारकडून तुमचे काहीही भले होणार नाही, त्यासाठी एकदा माझ्या हातात सत्ता द्या, असे आवाहन राज यांनी करताच उपस्थित शेतकर्‍यांनी टाळ्यांचा कडकडाट केला.