Fri, Apr 26, 2019 03:57होमपेज › Mumbai-Thane-Raigad › ठाणे ते गेटवे ऑफ इंडिया एका तासात 

ठाणे ते गेटवे ऑफ इंडिया एका तासात 

Published On: Apr 28 2018 1:52AM | Last Updated: Apr 28 2018 1:49AMठाणे : प्रतिनिधी 

जलवाहतुकीच्या ठाणे-कल्याण-वसई या फेज -1 ला केंद्राची तसेच राज्याची तत्त्वता मान्यता मिळाल्यानंतर आता फेज-2 चा डीपीआर तयार करण्याचे काम ठाणे महापालिकेच्या वतीने सुरू करण्यात आले आहे. ठाणे ते गेटवे ऑफ इंडिया आणि ठाणे ते पनवेल तसेच जेएनपीटीला जोडणारा हा फेज-2 चा जलमार्ग आहे. हा प्रकल्प कितपत यशस्वी होऊ शकतो याचा अहवाल तयार करण्यात आला असून हा अहवाल राज्य शासनाला 24 एप्रिल रोजी सादर केल्यानंतर  डीपीआर तयार करण्याची अनुमती राज्य शासनाकडून ठाणे महापालिकेला मिळाली. या प्रकल्पाचा व्यवहार्यता अहवाल तयार केल्यानंतर हा अहवाल केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर सादर केला जाणार आहे. येत्या तीन महिन्यांत डीपीआर तयार करण्यात येईल, असे या अधिकार्‍यांच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.

दुसर्‍या टप्प्यातील जलवाहतुकीमुळे 20 टक्के रस्तेवाहतुकीचा भार हलका होणार असून सध्या घोडबंदरहून मुंबईला जाण्यासाठी जे दोन तास लागतात तो प्रवास 1 तासाने कमी होणार असल्याचा दावा ठाणे महापालिकेच्या वतीने करण्यात आला आहे.

Tags : Mumbai, Thane,  Gateway of India, one hour, water transport,