Tue, Apr 23, 2019 22:33होमपेज › Mumbai-Thane-Raigad › ‘पद्मावत’वरून  करणी सेनेत संभ्रम

‘पद्मावत’वरून  करणी सेनेत संभ्रम

Published On: Feb 04 2018 1:55AM | Last Updated: Feb 04 2018 1:24AMमुंबई/जयपूर: वृत्तसंस्था 

संजय लीला भन्साळी यांच्या ‘पद्मावत’ चित्रपटाविरुद्ध आंदोलनावरून आता करणी सेनेतच संभ्रम निर्माण झाला आहे. राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या काही  नेत्यांनी या चित्रपटाविरुद्ध सुरु असलेले आंदोलन मागे घेत असल्याची घोषणा  मुंबईत केली. मात्र त्यानंतर ज्या नेतृत्वाखाली देशभरात आंदोलन सुरु आहे, त्या लोकेंद्रसिंग कालवी आणि सुखदेवसिंग गोगामेंडी यांनी मात्र चित्रपटाला विरोध कायम असून आंदोलन सुरुच राहणार असल्याची माहिती जयपूरमध्ये दिली. 

राजपूत करणी सेनेच्या काही पदाधिकार्‍यांनी शुक्रवारी मुंबईत हा चित्रपट पहिल्यानंतर विरोध मागे घेण्याची घोषणा केली. हा चित्रपट पाहून प्रत्येक राजपूत व्यक्‍तीला अभिमानच वाटेल, असे संघटनेचे नेते योगेंद्रसिंग खट्टर यांनी सांगितले. 

कालवी हे श्री राजपूत करणी सेनेचे प्रमुख असून गोगामेंडी अशा नावाची दुसरी संघटना असलेल्या श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रमुख आहेत. गोगामेंडी गटाच्या मुंबई शाखेने चित्रपटाला असलेला विरोध मागे घेत असल्याचे पत्र निर्मात्यांना दिले. मात्र मुंबई शाखेला आम्ही अशा प्रकारचे कोणतेही निर्देश दिले नव्हते, असा दावा गोगामडी यांनी केला आहे. या पत्रावर सही करणार्‍या सर्वांचीच आम्ही हकालपट्टी केली असल्याचेही गोगामेंडी यांनी स्पष्ट केले. 

कालवी यांनी स्वतंत्रपणे पत्रकार परिषद घेऊन आंदोनलन मागे घेण्यात येणार नसल्याचे स्पष्ट केले. मात्र सोमवारी जोधपूर येथे होणार्‍या चित्रपटाच्या विशेष शोसाठी आमचा विरोध नसल्याचेही स्पष्ट केले. या शोसाठी उच्च न्यायालयाचे न्यायमुर्ती उपस्थित राहणार असल्याचे वृत्त आहे.