Thu, Jun 27, 2019 18:27होमपेज › Mumbai-Thane-Raigad › एसी लोकल नाताळपासून

एसी लोकल नाताळपासून

Published On: Dec 21 2017 2:10AM | Last Updated: Dec 21 2017 1:18AM

बुकमार्क करा

मुंबई : प्रतिनिधी

बहुप्रतिक्षित वातानुकुलित लोकलसाठी सर्वात महत्त्वाची असलेली रेल्वे सुरक्षा आयोगाची अखेर परवानगी मिळाली. लखनऊ येथील मुख्य आयुक्तांनी ही मंजुरी दिली असल्याने आता नाताळपासून मुंबईकरांना मेट्रो 1 प्रमाणेच लोकलमध्येही एसीची गारेगार हवा अनुभवयाला मिळणार  आहे. 

मुंबईत गेल्या काही वर्षांपासून एसी लोकल चालविण्याबाबत चर्चा सुरू असून त्यास आता मूर्त स्वरूप मिळणार आहे. ही सेवा चालविताना सुरक्षेसंदर्भात कोणतीही त्रुटी राहू नये, यासाठी रेल्वे बोर्ड आणि मुख्य सुरक्षा आयुक्तांकडून काळजी घेतली जात आहे. रेल्वे बोर्डानेही या लोकल सेवेविषयी अधिक काळजी घेण्याच्या सूचना केल्या आहेत. एसी लोकल चर्चगेट ते विरारपर्यंत चालविण्यात येणार आहे.

पश्चिम रेल्वेने काही दिवसांपूर्वी ही सेवा सुरू करण्यासाठी रेल्वे बोर्डाकडे पत्र पाठविले होते. त्यास सकारात्मक प्रतिसाद देताना बोर्डाने सेवा चालविण्यासाठी परवानगी दिली आहे. दिवसाला 12 फेर्‍या चालविण्यास परवानगी असली, तरीही सुरुवातीला आठ ते दहाच फेर्‍या चालवल्या जातील, अशी शक्यता आहे.