Fri, Sep 21, 2018 05:37होमपेज › Mumbai-Thane-Raigad › किरकोळ वादातून मित्राकडून मित्राची हत्या

किरकोळ वादातून मित्राकडून मित्राची हत्या

Published On: Jan 18 2018 1:57AM | Last Updated: Jan 18 2018 1:02AM

बुकमार्क करा
तलासरी : वार्ताहर

मित्राचा वाढदिवस साजरा करण्यासाठी आलेल्या प्रतिक कांतिभाई पटेल (25, रा. वापी, टाकीफलीया) याची मित्रानेच किरकोळ वादातून अंगावर गाडी घालून हत्या केल्याची घटना सोमवारी संध्याकाळी आच्छाड येथे घडली. यानंतर आरोपी फरार झाला आहे.

गुजरात वापी येथे राहणारे 10 मित्र-मैत्रिणी, मैत्रिणीचा वाढदिवस साजरा करण्यासाठी महाराष्ट्राच्या सीमेवरील अच्छाड येथील मँगो रिसॉर्टमध्ये आले होते. वाढदिवस साजरा करताना मद्यपान व जेवन करताना काही कारणावरून त्यांचे आपासात शिवीगाळ व भांडण झाले. त्याचा मनात राग धरून पार्किंगमध्ये गाडीच्या डिकीमधून बॅट काढून मारण्याचा प्रयत्न झाला. त्यानंतर मुंबई-अहमदाबाद महामार्गाने वापीकडे जात असताना अच्छाड गावच्या हद्दीत आरोपी निमेश तन्ना आपली कार (होंडा डब्ल्यू आर व्ही) भरधाव चालवून प्रतिक पटेलच्या ब्रिझा कारला पाठीमागून जोरदार ठोकर मारून पुढे निघून गेला. तसेच काही वेळाने कार पुन्हा रिव्हर्स पाठीमागे घेऊन उघड्या दरवाजाला ठोकर मारून नुकसान करून रिव्हर्समध्ये आणखी एक मोटारसायकल व सायकल यांना ठोकर मारली. यानंतर पुन्हा दरवाजाजवळ खाली पडलेल्या प्रतिक पटेल याच्या अंगावरून गाडी घालून त्याला चिरडून ठार मारून पळ काढला.

आरोपी निमेश तन्ना हा वापीमधील बिल्डरचा मुलगा असून श्रीमंत घराण्यातला असल्याचे सांगण्यात येत आहे. याबाबत तलासरी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला असून पोलीस निमेशचा शोध घेत आहेत.