होमपेज › Mumbai-Thane-Raigad › मुंबई पालिकेच्या रुग्णालयांत ज्येेष्ठांवर मोफत उपचार

मुंबई पालिकेच्या रुग्णालयांत ज्येेष्ठांवर मोफत उपचार

Published On: Jun 29 2018 1:36AM | Last Updated: Jun 29 2018 12:56AMमुंबई : पुढारी वृत्तसंस्था

ज्येेष्ठ नागरिकांसाठी एक गुडन्यूज आहे. मुंबई महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये 60 वर्षांवरील बुजुर्गांना  लवकरच मोफत उपचाराचा लाभ मिळणार आहे. यासंदर्भातील प्रस्तावाला महापालिकेच्या आरोग्य समितीने नुकतीच मंजुरी दिली असून महापालिका सभागृहाच्या मंजुरीनंतर सप्टेंबर महिन्यात या योजनेची अंमलबजावणी केली जाणार आहे. 

या योजनेचा मुंबई महापालिकेची हॉस्पिटल्स, दवाखाने व आरोग्य केंद्रात येणार्‍या वृध्दांना लाभ घेता येणार आहे. या ठिकाणी तपासणीबरोबरच शस्त्रक्रियेची सुविधाही मोफतच मिळणार आहे. काही खास उपचारांसाठी मात्र पैसे मोजावे लागणार आहेत. राज्य सरकारच्या हॉस्पिटलमध्ये ज्येेष्ठ नागरिकांना अशा प्रकारची सुविधा मिळते. या पार्श्‍वभूमीवर 2017 मध्ये मुंबई महापालिकेतही अशा प्रकारची मागणी करण्यात आली होती. त्याप्रमाणे प्रस्ताव तयार करून त्यास मंजुरी देण्यात आली आहे. विशेष म्हणजे या रुग्णालयांमध्ये वृध्दांना उपचारात 50 टक्के सवलत देण्याचा प्रस्ताव पहिल्यापासून होता. 

या सुविधेसाठी वृध्दांना वयाचा दाखला देणे आवश्यक असून त्या आधारावर रुग्णाला ज्येेष्ठ नागरिकांच्या श्रेणीत ठेवले जाणार आहे. महापालिकेतर्फे आरोग्य व्यवस्थापन माहिती यंत्रणा (एचएमआयएस) सुरू करण्याचा प्रयत्न सुरू आहे. या यंत्रणेमुळे ज्येष्ठ नागरिकांना सदर सुविधा पुरवणे सोपे होणार आहे.