Fri, Jul 19, 2019 20:56होमपेज › Mumbai-Thane-Raigad › हिंदमाताला टॉवरच्या आगीत चौघांचा मृत्यू

हिंदमाताला टॉवरच्या आगीत चौघांचा मृत्यू

Published On: Aug 23 2018 1:38AM | Last Updated: Aug 23 2018 1:37AMमुंबई : प्रतिनिधी

हिंदमाता परिसरात असलेल्या क्रिस्टल टॉवर इमारतीच्या 12 व्या मजल्यावर बुधवारी सकाळी साडेआठच्या सुमारास लागलेल्या आगीत चार जणांचा मृत्यू झाला तर 17 जण जखमी झाले. चौघांपैकी दोन जण होरपळून मृत्युमुखी पडले तर दोघांचा धुरात गुदमरूम मृत्यू झाला आहे. शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे. अग्निशमन दलाला तब्बल चार तासांनंतर आग आटोक्यात आणण्यात यश आले.

हिंदमाता परिसरात असलेल्या क्रिस्टल टॉवर इमारतीला सकाळी साडेआठच्या सुमारास आग लागली. आगीनंतर परिसरात धुराचे लोट दिसू लागले. 12 व्या मजल्यास लागलेल्या आगीने तात्काळ भीषण रूप धारण केले. ही आग विझविण्यासाठी अग्निशमन दलाच्या 12 गाड्या 8 फायर बंब तसेच शिड्या असलेल्या 3 अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. आगीचे भीषण रूप तसेच अनेक रहिवासी इमारतीत असल्यामुळे लेवल 4 ची आग असल्याचे अग्निशमन दलाकडून जाहीर करण्यात आले. अग्निशमन दलासोबत अनेक नागरिकांनी इमारतीतील नागरिकांना सुखरूप बाहेर काढण्यासाठी इमारतीत धाव घेतली. 12 व्या मजल्यावर राहणार्‍या माशुक शफी यांच्या घराजवळ आग लागल्याची समोर येत असतानाच हे कुटूंब बकरी ईद निमित्त इमारतीखाली आले होते. धूर पाहून माशुक शफी व त्यांचे वसई येथे राहणारे मित्र संजीव नायर यांनी इमारतीत धाव घेतली. या इमारतीतील शुभदा शिर्के यांना वाचायला गेलेले संजीव नायर बाहेर आलेच नाहीत. त्यांचा होरपळून मृत्यू झाल.शुभदा शिर्कें व बबलू शेख यांचाही धुरामुळे मृत्यू झाला.

अग्निशमन दलाच्या जवानांकडून त्यात हायड्रोलीक शिडी असलेल्या वाहनातून 18 जणांना खाली उतरविले त्यात 11 स्त्रिया एक लहान मुलगी 6 पुरुषांचा समावेश होता. 11 स्त्रियांपैकी 3 स्त्रिया गरोदर होत्या. त्याच वेळी इमारतीच्या जिन्यांहूनही नागरिकांना खाली आणण्यात येत होते. अग्निशमन दल व काही स्थानिक नागरिकांकडून 25 जणांना इमारतीतून खाली आणण्यात यश आले. त्यातील 21 जणांना केईएम रुग्णालयात दाखल करण्यात आले. अग्निशमन दलाला सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास आग विजवण्यात यश आले. 

मृतांची नावे : बबलू शेख(36), अशोक संपत, शुभदा शिर्के  (62), संजीव नायर.

जखमींची नावे : शेख माशूक, वखार शेख, कार्तिक सुवर्णा, जयंत सावंत, नविन संपत, अझर शेख, वायवेट डिसूजा, अशपाक खान, डॉली मैती, जोत्स्ना बेरा, अक्षता सुवर्णा, विणा संपत, निधी संपत, चंद्रिका सुवर्णा

जखमी फायरमन: राजीव नरवडे (21) संदीप मांजरे (27)

21 जणांपैकी 4 नागरिकांचा  मृत्यू झाला असून 2 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.  काही रुग्णांना रात्री डिस्चार्ज देण्यात आला. तसेच 2 जणांना डॉक्टरांच्या देखरेखीखाली ठेवण्यात आले आहे.
- डॉ. अविनाश सुपे ( अधिष्ठाता, केईएम रुग्णालय)