Tue, Jul 23, 2019 02:41होमपेज › Mumbai-Thane-Raigad › पालघर जिल्ह्यातून चार मुलींचे अपहरण

पालघर जिल्ह्यातून चार मुलींचे अपहरण

Published On: May 22 2018 1:39AM | Last Updated: May 22 2018 1:12AMखानिवडे : वार्ताहर

पालघर जिल्ह्यातील नालासोपारा पूर्व, वालीव, नायगाव पूर्व व सातपाटी येथून चार मुलींचे अपहरण झाल्याच्या तक्रारी विविध पोलीस ठाण्यात दाखल झाल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. या सर्व मुली 16 ते 17 वयोगटातील असून त्यापैकी तीन घटना एकाच दिवशी घडल्या आहेत. 

नालासोपारा पूर्वेत राहणार्‍या व मेस्त्रींचे काम करणार्‍या एका कामगाराची 17 वर्ष वयाची मुलगी कुटुंबाला हातभार लागावा म्हणून काहीतरी काम शोधायला जाते असे सांगून 18 मे  रोजी घराबाहेर पडली होती. सर्वत्र शोध घेऊनही  ती अजूनही आलेली नाही. त्यामुळे तिच्या पालकांनी तुळींज पोलिसांत अपहरणाची तक्रार दाखल केली आहे. 

वालीव  भागात राहणार्‍या व नोकरी करणार्‍या एका कामगाराची 16 वर्ष वयाची मुलगी 18 मे  रोजी घरात कोणाशी काहीएक न सांगता निघून गेली असून अजूनही तिचा ठाव ठिकाणा लागत नसल्याने पालकांनी वालीव  पोलिसांत तिच्या अपहरणाची तक्रार दाखल केली आहे . 

नायगाव पूर्व येथे राहणार्‍या व पूजेचे साहित्य विकण्याचा धंदा करणार्‍या इसमाने आपल्या 17 वर्ष वयाच्या मुलीला कोणीतरी 18 मे  रोजी फूस लावून पळवून नेल्याची तक्रार वालीव पोलिसांत दाखल केली आहे.