Tue, May 21, 2019 18:09होमपेज › Mumbai-Thane-Raigad › महामार्गावर वरई येथील अपघातात चौघांचा मृत्यू

महामार्गावर वरई येथील अपघातात चौघांचा मृत्यू

Published On: Jun 24 2018 1:34AM | Last Updated: Jun 24 2018 12:16AMकेळवे : वार्ताहर

मुंबई-अहमदाबाद महामार्गावर मनोर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वरई ब्रिज येथे गुजरात वाहिनीवर ट्रॅक्स आणि टेम्पोमध्ये शनिवारी संध्याकाळी झालेल्या भीषण अपघातात ट्रॅक्स मधील 4 प्रवासी ठार झाले, तर 2 जण गंभीर जखमी झाले. जखमींमध्ये एका महिलेचा समावेश आहे. 

महामार्गावर मुंबईच्या दिशेने जाणार्‍या ट्रॅक्सच्या चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने  ट्रॅॅक्स गुजरातकडे जाणार्‍या गाडीवर आदळली. यावेळी तीन प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला, तर मनोज भास्कर धूम (रा.नाशिक, सुरगाणा) यांचा वसई येथे उपचारादरम्यान मृत्यू झाला. जखमींना वसईच्या आयसीस रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचे मनोर पोलीस ठाण्याच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक सिद्धबा जायभाये यांनी सांगितले.