Sun, Feb 17, 2019 05:29होमपेज › Mumbai-Thane-Raigad › सलग चार दिवस बँका बंद

सलग चार दिवस बँका बंद

Published On: Apr 25 2018 2:24AM | Last Updated: Apr 25 2018 2:10AMमुंबई : प्रतिनिधी 

या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात म्हणजे 28 एप्रिल, 29 एप्रिल आणि 30 एप्रिल या सलग तीन दिवशी बँका बंद राहणार आहेत. तसेच 1 मे रोजीही महाराष्ट्र दिन असल्याने बँका बंद असणार आहे. यामुळे ग्राहकांची ऐन लग्नसराईमध्ये तारांबळ उडण्याची शक्यता आहे. यामुळे नागरिकांना याआधीच बँकेची कामे करण्यासाठी बँकेकडे धाव घ्यावी लागणार आहे.

या चार दिवसांत आर्थिक देवाण-घेवाण करण्यासाठी ग्राहकांना एटीएमचा पर्याय उपलब्ध असणार आहे. तसेच एटीएमवरच आपले आर्थिक व्यवहार करावे लागणार आहेत. यानंतर 2 मेपासून पुन्हा बँका पूर्ववत सुरू होणार आहेत. सलग चार दिवस बँका बंद असल्याने नंतर बँका उघडल्यावर बँकेत मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे.

Tags : Mumbai, Four consecutive days, Banks closed, Mumbai news,