Tue, Mar 26, 2019 22:16होमपेज › Mumbai-Thane-Raigad › मुंबई-ठाण्यातील चार रक्तपेढ्या फेसबुकच्या रक्तदान मोहिमेत

मुंबई-ठाण्यातील चार रक्तपेढ्या फेसबुकच्या रक्तदान मोहिमेत

Published On: Feb 24 2018 1:37AM | Last Updated: Feb 24 2018 12:55AMमुंबई : प्रतिनिधी

आरोग्य विषयक जनजागृतीसाठी फेसबुक रक्तदान मोहीम सुरू करणार आहे. यात युजर्सनी आरोग्यविषयक माहिती द्यायची आणि आपला रक्तगट नमूद करायचा आहे. एखाद्याला रक्ताची गरज भासल्यास फेसबुक रक्तपेढ्यांचे क्रमांक पुरवणार आहे. रक्तदानासाठी लोकांचा पुढाकार वाढावा यासाठी ही मोहीम सुरू करण्यात येणार असून यात मुंबई-ठाण्यातील चार रक्तपेढ्यांचा समावेश आहे. यासाठी फेसबुकच्या अधिकार्‍यांनी भारतात येऊन सर्व्हेक्षण केले.

भारतातील कोट्यावधी लोक दिवसभरात अनेक वेळा फेसबुकचा वापर करतात. याच फेसबुकने आता समाजात आरोग्यविषयक जनजागृतीसाठी करण्यासाठी एक पाऊल पुढे टाकले आहे. यासाठी फेसबुक लवकरच एक नवीन पर्याय उपलब्ध करून देणार आहे. ज्यात युजर्सना आपली मेडिकल हिस्ट्री भरावी लागेल. या माध्यमातून रक्तदानाबाबत जनजागृती करणे आणि गरजेच्या वेळी मदत करणे हे या मोहिमेचे उद्दिष्ट आहे.