Tue, Oct 24, 2017 16:50



होमपेज › Mumbai-Thane-Raigad › मुंबईतील चार नगरसेवक किडनॅप : सोमय्या

मुंबईतील चार नगरसेवक किडनॅप : सोमय्या

Published On: Oct 13 2017 4:11PM | Last Updated: Oct 13 2017 5:04PM

बुकमार्क करा






मुंबई : प्रतिनिधी
मुंबईत चार नगरसेवकांना किडनॅप केल्याचा आरोप भाजप खासदार किरीट सोमय्या  यांनी केला आहे. आमच्या मित्रपक्षांनी जवळजवळ चार नगरसेवकांना किडनॅप केल्याचे त्यांनी म्हटले असून, संबंधित नगरसेवकांना दोन ते चार कोटी रुपयांचे आमीष दाखविण्यात आल्याचा आरोपही सोमय्या यांनी केला आहे. 

भांडूप पोटनिवडणुकीनंतर मुंबई महापालिकेत सत्तेचे गणित बदलू लागले आहे. त्यामुळे नगरसेवकांना आपल्या गोटात घेण्यासाठी शिवसेना आणि भाजपमध्ये चढाओढ सुरू झाली आहे. त्यामुळे आता एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पाच नगरसेवक फोडण्याचा प्रयत्न शिवसेना करत असल्याची चर्चा आहे. त्याचवेळी खासदार सोमय्या यांनी कोणत्याही राजकीय पक्षाचे नाव न घेता चार नगरसेवक किडनॅप करण्यात आल्याचा आरोप केला आहे.


खासदार सोमय्या म्हणाले, 'आमच्या मित्रपक्षांनी जवळजवळ चार नगरसेवकांना किडनॅप केले आहे. त्यांना दोन ते चार कोटी रुपयांचे आमीष दाखवण्यात आले आहे. त्यातील एक नगरसेवक घाटकोपरचा आहे. त्यांच्या कुटुंबियांनी आम्हाला हे कळवले आहे. यासंबंधी निवडणूक आयोग, पोलिस या सर्वांशी चर्चा करुन या संदर्भात ताबडतोब कारवाई करण्याची मागणी केली आहे.'