होमपेज › Mumbai-Thane-Raigad › दीपोत्सवाने उजळला रायगडवरील चित्त दरवाजा (video)

दीपोत्सवाने उजळला रायगडवरील चित्त दरवाजा (video)

Last Updated: Nov 13 2019 12:22PM

शेकडो दिव्यांनी उजळला रायगड किल्लारायगड : प्रतिनिधी

त्रिपुरा पौर्णिमेनिमित्ताने किल्ला रायगड हा दिपोत्सवाने उजळला आहे. स्वराज्याची राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या किल्ले रायगडावरील चित्त दरवाजा आणि राजमाता जिजाऊ यांच्या समाधीवर शेकडो दिवे लावण्यात आले. यामध्ये चित्त दरवाजाजवळील पायऱ्या आणि समाधीने शिवभक्तांचे लक्ष वेधून घेतले. यामुळे रायगडावरील दिपोत्सवाचे नयनरम्य दृश्य पाहण्यासाठी किल्ले रायगडाच्या पायथ्याशी शिवभक्तांनी मोठी गर्दी केली होती. 

यावेळी राजमाता जिजाऊ समाधीजवळ मावळा संघटना रायगड, कोकण कडा मित्र मंडळाचे दिपक शिंदे, महेश मोरे यांनी उपस्थित असलेल्या शिवभक्तांना मार्गदर्शन केले. तर यावेळी हा नयनरम्य दृश्य पाहण्यासाठी हजारो शिवभक्त रायगड किल्याच्या पायथ्याशी हजर होते.