Wed, Jan 16, 2019 04:47होमपेज › Mumbai-Thane-Raigad › आजी-माजी नगरसेवकांत फ्री-स्टाईल

आजी-माजी नगरसेवकांत फ्री-स्टाईल

Published On: Feb 15 2018 1:57AM | Last Updated: Feb 15 2018 1:20AMउल्हासनगर : वार्ताहर 

ई-टेंडरिंग निविदा भरल्याचा राग मनात धरून शिवसेनेच्या माजी नगरसेवकाने भाजपाच्या स्वीकृत नगरसेवकाची उल्हासनगर महापालिकेतील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयतच पिटाई केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी उल्हासनगर पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.

उल्हासनगर महापालिकेत ई-टेंडरिंग निविदा भरण्याची प्रक्रिया सुरू असून प्रभाग 13 मध्ये होणार्‍या कामाच्या निविदा शिवसेनेचे माजी नगरसेवक सुरेश जाधव यांच्या मुलाने आणि भाजपाचे स्वीकृत नगरसेवक प्रदिप रामचंदानी यांच्या मुलाने ई-टेंडरिंगद्वारे भरल्या आहेत.मंगळवारी महापालिकेच्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मुख्यालयात या निविदेवरून माजी नगरसेवक सुरेश जाधव यांनी भाजपाचे नगरसेवक प्रदिप रामचंदानी यांच्यात बाचाबाची होऊन जाधव यांनी रामचंदानी यांची कार्यालयातच पिटाई केली.