Thu, Apr 25, 2019 22:10होमपेज › Mumbai-Thane-Raigad › सेना महाराष्ट्रात स्वबळावर सत्तेत का येऊ शकत नाही?

सेना महाराष्ट्रात स्वबळावर सत्तेत का येऊ शकत नाही?

Published On: Jun 20 2018 2:01AM | Last Updated: Jun 20 2018 1:48AMमुंबई : प्रतिनिधी

इतर राज्यांमध्ये प्रादेशिक पक्ष पूर्ण ताकदीनिशी सत्तेवर आले मग शिवसेना महाराष्ट्रात पूर्णपणे सत्तेवर का येऊ शकत नाही, असा सवाल करत शिवसेनेचे नेते आणि माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांनी एकप्रकारे संघटनेला कानपिचक्याच दिल्या.

देशातील काही राज्यांत त्या त्या ठिकाणचे प्रादेशिक पक्ष हे अल्पावधीतच सत्तेवर आले. तसेच शिवसेनेला महाराष्ट्रात पूर्णपणे सत्तेत यायचं असेल तर मुंबईसारखं काम आणि महाराष्ट्रात ताकद निर्माण करा. तसे झाले तर शिवसेनेला कुणाचा बाप हरवू शकत नाही, असेही ते पदाधिकार्‍यांच्या शिबिरात म्हणाले.

पश्‍चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेस, तेलंगणात तेलंगण राष्ट्र समिती, तामिळनाडूमध्ये द्रमुक, अण्णा द्रमुक, तेलगू देसम यासारखे प्रादेशिक पक्ष सत्तेवर आले. समाजवादी पक्ष, बसप या राजकीय पक्षांनी उत्तर प्रदेश, बिहार सारख्या राज्यातील ताकदीच्या जोरावर सत्तेत आले, मग महाराष्ट्रात शिवसेना पूर्णपणे सत्तेवर का येऊ शकत नाही याचे उत्तर आपण शोधले पाहिजे, असे सांगत मनोहर जोशी यांनी संपूर्ण राज्यात शिवसेनेचे काम उभे करण्याचे आवाहन केले.