Sat, Jul 20, 2019 15:24होमपेज › Mumbai-Thane-Raigad › रिपाइंच्या माजी नगरसेवकाचा आकस्मिक मृत्यू

रिपाइंच्या माजी नगरसेवकाचा आकस्मिक मृत्यू

Published On: Jan 25 2018 1:48AM | Last Updated: Jan 25 2018 1:34AMधारावी : वार्ताहर

रिपाइं (आठवले) गटाचे धारावी मुकुंदनगर परिसरातील माजी नगरसेवक साबा रेड्डी बोरा यांचे मंगळवारी लीलावती रुग्णालयात अल्पशा आजाराने निधन झाले. अंत्ययात्रेसाठी बोरा यांचा भाऊ अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजनचा हस्तक डी. के. राव येणार असल्याने मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. 

बोरा यांनी आपल्या कारकिर्दीत अनेक प्रभावी कामे केली. त्यामुळे त्यांच्या जाण्याने धारावीच्या मुकुंदनगर परिसरात हळहळ व्यक्‍त केली जात आहे. त्यांनी पालिकेचे बाजार उद्यान अध्यक्षपद देखील भूषवले. 

त्यामुळे त्यांच्या निधनाने रिपाइंचे मोठे नुकसान झाले, असल्याची चर्चा धारावीत होती. अंत्ययात्रा निघण्याच्या काही मिनीटे अगोदर गँगस्टार डी.के.रावला चोख पोलीस बंदोबस्तात धारावी पोलीस ठाण्यात आणले. तिथे नोंद करून अंतिम दर्शनासाठी घरी नेण्यात आले. डी.के. राव सध्या खंडणीच्या गुन्ह्याची  शिक्षा भोगत आहे. अंत्यदर्शनासाठी शिवाजी पार्क स्मशानभूमीवर गर्दी उसळली होती.