Tue, Mar 26, 2019 23:52होमपेज › Mumbai-Thane-Raigad › माहिती खात्याच्या माध्यमातून भाजप, संघाचा छुपा अजेंडा

माहिती खात्याच्या माध्यमातून भाजप, संघाचा छुपा अजेंडा

Published On: Apr 28 2018 2:01AM | Last Updated: Apr 27 2018 8:43PMमुंबई : प्रतिनिधी

राज्याच्या माहिती महासंचालनालयाच्या माध्यमातून राज्य सरकारने केलेली कामे जनतेपर्यंत पोहोचविण्याचे काम खर्‍या अर्थाने झाले पाहिजे. मात्र, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील सरकार या खात्याचा वापर भाजप आणि संघाचा छुपा अजेंडा राबवत असल्याची टीका काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी मुंबईत पत्रकारांशी बोलताना केली. 

अलीकडच्या काळात या खात्याचा उपयोग सरकारी योजनांऐवजी राजकीय कारणांसाठीच जास्त केला जात आहे. महामित्र या योजनेच्या माध्यमातून अनुलोम या भाजपशी संबंधित लोकांच्या संस्थेला काम देण्याचा प्रकार मध्यंतरी झाला. हे प्रकरण उघडकीस आल्यावर महामित्र हे मोबाईल अ‍ॅप बंद करण्यात आले. यासंदर्भात चौकशी झाली पाहिजे, असे पृथ्वीराज चव्हाण म्हणाले. 

लोकराज्य या सरकारी मासिकाच्या महाराष्ट्र अहेड या इंग्रजी आवृत्तीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या छायाचित्राच्या ठिकाणी विलासराव देशमुख यांचे छायाचित्र कसे वापरले, याची चौकशी करून दोषी अधिकार्‍यांवर कारवाई करावी, अशी मागणी चव्हाण यांनी केली आहे.