Mon, Mar 25, 2019 13:13होमपेज › Mumbai-Thane-Raigad › गुरुगोविंदसिंहजी स्टेडिअमसाठी केंद्राकडून ६७ कोटी 

गुरुगोविंदसिंहजी स्टेडिअमसाठी केंद्राकडून ६७ कोटी 

Published On: Feb 07 2018 2:23PM | Last Updated: Feb 07 2018 1:59PMमुंबई : प्रतिनिधी

श्री गुरुगोविंदसिंहजी यांच्या 350 व्या जयंतीनिमित्त राज्य सरकारने नांदेड येथे प्रस्तावित केलेल्या स्टेडिअमचे आधुनिकीकरण आणि अध्यासन संकुलाच्या इमारतीसाठी केंद्र सरकारकडून 67 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. 

श्री गुरूगोविंदसिंहजी यांचे 350 वी जयंती  गेल्या वर्षी देशभरात मोठ्या उत्साहात साजरी झाली होती. श्री गुरुगोविंदसिंहजी यांच्या स्मृतींना अभिवादन म्हणून नांदेड येथील श्री गुरुगोविंदसिंहजी स्टेडिअमचे आधुनिकीकरण आणि स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात श्री गुरुगोविंदसिंहजी अध्यासन संकुल व संशोधन केंद्राची इमारत बांधण्याचे आश्वासन देण्यात आले होते. त्यासाठी मुख्यमंत्री फडणवीस यांनी केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाकडे सातत्याने पाठपुरावा केला होता.

या पाठपुराव्यास यश मिळाले असून या स्टेडिअमच्या आधुनिकीकरणासाठी 45 कोटी आणि श्री गुरुगोविंदसिंहजी अध्यासन संकुल व संशोधन केंद्राच्या इमारत बांधकामासाठी 22 कोटी रुपये असा एकूण 67 कोटींचा निधी मंजूर झाला आहे. या विभागाचे राज्यमंत्री डॉ. महेश शर्मा यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवून याबाबत माहिती दिली आहे. या निधीच्या मंजुरीबद्दल मुख्यमंत्र्यांनी प्रधानमंत्री नरेंद मोदी, केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह आणि  सांस्कृतिक राज्यमंत्री डॉ. शर्मा यांचे आभार मानले आहेत.