Mon, Nov 19, 2018 21:00होमपेज › Mumbai-Thane-Raigad › स्टार्टअपसाठी राज्याचे फिनटेक धोरण जाहीर

स्टार्टअपसाठी राज्याचे फिनटेक धोरण जाहीर

Published On: Feb 07 2018 1:38AM | Last Updated: Feb 07 2018 1:29AMमुंबई : प्रतिनिधी

महाराष्ट्राला फायनान्शियल टेक्नॉलॉजी क्षेत्रात जागतिक स्तरावर पहिल्या पाच केंद्रांत स्थान मिळवून देण्यासाठी महत्वाकांक्षी असे फिनटेक धोरण राज्य सरकारने जाहीर केले आहे. अशा स्वरुपाचे धोरण जाहीर करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य असून या धोरणानुसार पुढील तीन वर्षात राज्यात किमान 300 स्टार्ट-अप्सची उभारणी होणार आहे. राज्यातील शैक्षणिक आस्थापनांत फिनटेकमध्ये पूर्णवेळ पदवी अभ्यासक्रम आणि व्यावसायिक पदवी अभ्यासक्रम सुरु करण्याकरिता प्रोत्साहन देण्यात येणार आहे.

स्मार्ट फिनटेक सेंटरच्या स्थापनेसाठी अतिरिक्‍त चटई क्षेत्र निर्देशांक उपलब्ध करुन देण्यात येणार असून बांधीव क्षेत्राच्या किमान 85 टक्के क्षेत्र हे फिनटेक व्यवसायासाठी राखीव असेल.  

मुंबईच्या मध्यवर्ती भागात किमान 10,000 चौरस  फूट क्षेत्र, फिनटेक कंपन्यांना को-वर्किंग स्पेस उपलब्ध करून दिले जाईल. यामध्ये शैक्षणिक संस्था, फिनटेक एक्सीलरेटर्स, बँका, तंत्रशास्त्रविषयक पेढ्या आणि आयटी उद्याने आदी भागीदार स्पोक लोकेशन्स म्हणून काम करू शकतील.