Wed, Jul 17, 2019 20:29होमपेज › Mumbai-Thane-Raigad › ‘पद्मावती’साठी एकवटली चित्रनगरी!

‘पद्मावती’साठी एकवटली चित्रनगरी!

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

मुंबई : प्रतिनिधी

‘पद्मावती’ चित्रपटाला देभभरातून विरोध होत असताना या चित्रपटाच्या समर्थनार्थ गोरेगावच्या चित्रनगरीमध्ये ज्युनियर कलाकार रविवारी एकवटलेले दिसून आले. या चित्रपटातील अभिनेत्री दीपिका पादुकोन, दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांना येत असलेल्या धमक्यांचा आंदोलनातून निषेध नोंदवण्यात आला.

पद्मावती चित्रपटाला विरोध म्हणजे अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर घाला असल्याची टीका ज्युनियर कलाकार असोसिएशनचे सचिव अशोक पंडित यांनी केली. या प्रकारामुळे चित्रपट लेखकांच्या मनामध्ये भीती निर्माण झाली आहे. लोकशाहीने आम्हाला  दिलेला अधिकार कुणीही हिरावू शकत नसल्याचेही ते म्हणाले. या प्रकरणावर सत्ताधारी भाजप सरकार, पंतप्रधान गप्प असल्याबाबत इम्प्राच्या सेक्रेटरी सुषमा शिरोमणी यांनी  सवाल उपस्थित केला. 

कलाकारांनी हातामध्ये विविध समर्थनाचे पोस्टर्स घेऊन विरोध करणार्‍यांचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. यापुढेही ज्युनियर कलाकारांची युनियन पूर्ण ताकदीनिशी भन्साली यांच्या पाठीशी उभी राहील, असे आश्‍वासन आंदोलनकर्त्या कलाकारांनी दिले.