Wed, Nov 21, 2018 13:19होमपेज › Mumbai-Thane-Raigad › मराठा आरक्षणासाठी सेनेने सरकारचा पाठिंबा काढावाः अशोक चव्हाण

मराठा आरक्षणासाठी सेनेने सरकारचा पाठिंबा काढावाः अशोक चव्हाण

Published On: Jul 28 2018 2:01AM | Last Updated: Jul 28 2018 1:39AMमुंबई : विशेष प्रतिनिधी 

राज्यात मराठा आरक्षणासाठी आंदोलन सुरू आहे; पण सरकार मराठा आरक्षणाबाबत गंभीर दिसत नाही. सरकारवर दबाव वाढवण्यासाठी शिवसेनेसह भाजप सरकारला पाठिंबा देणार्‍या पक्षांनी व अपक्ष आमदारांनी सरकारचा पाठिंबा काढून घ्यावा, असे आवाहन प्रदेश काँग्रेस अध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी केले.

सरकारवर अंकुश ठेवण्यासाठी विरोधी पक्षाची आवश्यकता आहे. विरोधी पक्षाच्या आमदारांनी राजीनामे न देता मराठा आरक्षणाचा प्रश्न लावून धरावा. मराठा समाजाला आरक्षण मिळावे अशी सत्ताधारी पक्षाच्या आमदारांची प्रामाणिक इच्छा असेल तर त्यांनी राजीनामे देऊन सरकारवर दबाव वाढवावा, आंदोलकांनीही शांततामय मार्गाने आंदोलन करावे. आंदोलन हिंसक होणार नाही याची काळजी घ्यावी, असे आवाहन करतानाच हिंसाचारात सहभाग नसलेल्या अनेक आंदोलक युवक व महिलांवर सुडबुध्दीने गंभीर गुन्हे दाखल करण्यात आल्याचे ते म्हणाले.