Wed, Sep 26, 2018 18:10होमपेज › Mumbai-Thane-Raigad › हज यात्रेकरूंसाठी थेट आजपासून विमानसेवा

हज यात्रेकरूंसाठी थेट आजपासून विमानसेवा

Published On: Jul 29 2018 1:40AM | Last Updated: Jul 29 2018 1:40AMमुंबई : प्रतिनिधी

हज यात्रेकरूंना थेट सौदी अरेबियाला घेऊन जाणारे विमान 29 जुलै रोजी मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरून उडणार आहे. 29 जुलै ते 12 ऑगस्ट या कालावधीत हज यात्रेकरूंच्या सोईसाठी विमाने उडवण्यात येतील. मुंबईतून 14 हजार 600 यात्रेकरू यावर्षी हज यात्रेला जाणार आहेत. उड्डाणे सुरू झाल्यानंतर दररोज सरासरी 5 ते 6 विमाने यात्रेकरूंना सौदी अरेबियाला घेऊन जातील. मुंबईसोबत औरंगाबाद, नागपूर इथूनही हज यात्रेसाठी विमाने निघतील. औरंगाबाद इथून 29 ते 31 जुलै दरम्यान तर नागपूर इथून 29 जुलै ते 4 ऑगस्ट या कालावधीत हज यात्रेकरूंसाठी विमानांचे उड्डाण होईल. हज यात्रेकरूंचा परतीचा प्रवास मदिना येथून सुरू होईल. परतीच्या प्रवासात मुंबईसाठी मदिना येथून 12 ते 26 सप्टेंबर या कालावधीत विमानांची उड्डाणे होतील. तर नागपूरसाठी 11 ते 18 सप्टेंबर या कालावधीत उड्डाणे होतील. औरंगाबादसाठी 13 व 14 सप्टेंबर रोजी विमानांची उड्डाणे होतील.