Mon, Jun 24, 2019 17:22होमपेज › Mumbai-Thane-Raigad › भंगार दुकानाच्या आगीत कल्याणमध्ये ५ जण होरपळले

भंगार दुकानाच्या आगीत कल्याणमध्ये ५ जण होरपळले

Published On: Apr 10 2018 1:37AM | Last Updated: Apr 10 2018 1:07AMकल्याण : वार्ताहर

कल्याण पश्चिमेकडील बिर्ला कॉलेज रोडनजीक असलेल्या भोईर वाडी परिसरातील एका भंगाराच्या दुकानाला सोमवारी दुपारच्या सुमारास भीषण आग लागून पाच कर्मचारी होरपळल्याची घटना घडली. विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वीच याठिकाणी जुन्या फर्निचर विक्रीच्या दुकानाला भीषण आग लागली होती. त्यानंतर सोमवारी पुन्हा तसाच प्रकार घडल्याने स्थानिकांनी चिंता व्यक्त केली आहे. 

पूजन राजभर,सूरज गुप्ता, नंदलाल गुप्ता, मनोज गुप्ता व जगजीवन राजभर अशी जखमी कामगारांची नावे असून, त्यांच्यावर पालिकेच्या रुक्मिणीबाई रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सदरची भीषण आग घरगुती गॅस सिलिंडर लिक होऊन लागल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. तर ही शॉटसर्किटमुळे ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. 

बिर्ला कॉलेज रोड रस्त्यानजीक असलेल्या भोईरवाडी परिसरात एकमेकांना अगदी खेटून भंगारविक्रीची अनेक दुकाने थाटण्यात आली आहेत. अशाच एका भंगार खरेदी करण्याच्या दुकानातील कामगार मनोज गुप्ता सोमवारी दुपारी दोनच्या सुमारास जेवण बनवत असतानाच अचानकपणे भंगाराच्या दुकानाला आग लागली. दुकानात भंगार आलेल्या प्लास्टिकचे डबे, काच, लोखंडी तसेच कागदी पुठ्ठे व अन्य ज्वलनशील वस्तू  सर्वत्र  पसरलेले असल्याने आगीने क्षणार्धात रौंद्र रूप धारण केले.आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेत अर्ध्यातासांत ही आग आटोक्यात आणली. सुदैवाने या भीषण आगीत  जीवितहानी टाळली असली तरी मोठ्याप्रमाणात वित्तहानी झाली आहे.

Tags : Mumbai, Mumbai news, Five people, burnt, death, scrap shop, Kalyan,