होमपेज › Mumbai-Thane-Raigad › पाच हजाराहून अधिक पॉर्न साईट्स बंद होणार

पाच हजाराहून अधिक पॉर्न साईट्स बंद होणार

Published On: Dec 19 2017 5:25PM | Last Updated: Dec 19 2017 5:25PM

बुकमार्क करा

मुंबई : प्रतिनिधी

चाइल्ड पॉर्नशी संबंधीत पाच हजाराहून अधिक साईटस नवीन वर्षाच्या सुरुवातीला पूर्णपणे बंद होणार आहेत. सरकार यासाठी खास योजना तयार करत आहे. यासाठी गृहमंत्रालयाने बुधवार, 27 डिसेंबरला देशातील सर्व राज्यात पोलिस अधिकार्‍यांची बैठक बोलावली आहे. त्याचबरोबर अशाप्रकारचे व्हिडिओ जनरेट करणार्‍या आणि त्याचे प्रसारण करणार्‍यांना सरकार कठोर शिक्षा देणार आहे. यासाठी आयटी अ‍ॅक्टमध्ये देखील बदल करण्यात येईल. सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार, गृह मंत्रालयाने हे पाऊल उचलले आहे.

मंत्रालयाने यासाठी वेगळी टीम तयार केली आहे. यासाठी महिला आणि बाल विकास मंत्रालायची मदत घेतली जाईल. गृह मंत्रालयाच्या अधिकार्‍यांनी सांगितले की, अशा प्रकारच्या वेबसाईट्स बंद करणे आणि येणार्‍या पुढील काळात त्या पुन्हा सुरू होऊ न देणे यासाठी काम करण्यात आले आहे. पॉर्न, हेट कंटेंट आणि अफवा यासंबंधित कंटेन्ट ट्रक करण्यासाठी 100 हुन अधिक कॅचवर्ड बनवण्यात आले आहेत. यांच्या मदतीने वेबसाईट, यू-ट्यूब, फेसबुक  आणि ट्विटरवर अशाप्रकारचा मॅटर बॅन करण्यात आला आहे.