होमपेज › Mumbai-Thane-Raigad › पहिली हापूस पेटी मुंबईत दाखल

पहिली हापूस पेटी मुंबईत दाखल

Published On: Jan 24 2018 1:53AM | Last Updated: Jan 24 2018 12:24AMनवी मुंबई : प्रतिनिधी 

यंदाच्या हंगामातील हापूस आंब्याची पहिली पेटी मुंबई कृषि उत्पन्न बाजार समितीमध्ये मंगळवारी दाखल झाली. पाच ते सात डझनच्या पेटीला सात ते दहा हजाराचा बाजारभाव मिळाला.

बाजार समितीतील व्यापारी संजयशेठ पानसरे यांच्याकडे रत्नागिरी येथील बागाईतदार श्रीकुमार चाळके यांच्या शेतातील हापूसच्या 15 पेट्या दाखल झाल्या आहेत. या हापूस आंब्याचा दर्जा आणि प्रत उत्तम असल्याचे सांगण्यात आले.  या पेट्या बाजारात दाखल झाल्यानंतर पेट्यांची हापूस आंब्याचे अभ्यासक , शेतकरी प्रभाकर शेठ मुळे यांच्या हस्ते पूजा करण्यात आली.

एपीएमसी बाजारात दररोज साधारणतः 30 ते 35 पेट्यांची आवक रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यातून होईल अशी माहिती यावेळी व्यापार्‍यांनी दिली. एपीएमसीत दरवर्षी सुमारे सहाशे ते सातशे कोटी रुपयांच्या हापूसची विक्री केली जाते. त्याआधी घाऊक व्यापारी हापूस आंब्याचा मोसम सुरू होण्यापूर्वी कोकणातील शेतकर्‍यांना चारशे ते पाचशे कोटी रूपये वाटप करतात.