Sun, Jul 21, 2019 16:19
    ब्रेकिंग    होमपेज › Mumbai-Thane-Raigad › सोलापुरात पहिले कृत्रिम पाऊस केंद्र

सोलापुरात पहिले कृत्रिम पाऊस केंद्र

Published On: Apr 20 2018 1:25AM | Last Updated: Apr 19 2018 10:53PMमुंबई : विशेष प्रतिनिधी

राज्यातील वेधशाळेचे पावसाविषयीचे अंदाज चुकत असल्यामुळे पावसाअभावी शेतकर्‍यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असल्याचे पाहून केंद्रीय विज्ञान व तंत्रज्ञानमंत्री हर्षवर्धन यांनी सोलापूरमध्ये कृत्रिम पाऊस केंद्र उभारण्यास परवानगी दिली आहे. येत्या जूनपासूनच येथे प्रयोगास सुरुवात करण्यात येणार आहे.

सोलापूर या कमी पावसाचे प्रमाण असलेल्या जिल्ह्यामध्ये पाण्याअभावी शेतकर्‍यांना पिके घेता येत नाहीत. शेती कसण्यासाठी केलेला खर्चही वाया जात असल्यामुळे राज्याचे सहकार, पणन व वस्त्रोद्योग मंत्री सुभाष देशमुख यांनी सोलापूरमध्ये कृत्रिम पाऊस केंद्र उभारण्याचे निश्‍चित केले होेते. केंद्र सरकारकडे त्यांनी सतत पाठपुरावा केल्यामुळे कृत्रिम पाऊस केंद्राला सरकारने परवानगी दिली. यावर्षी दमदार पावसाचा अंदाज असला, तरी या केंद्रातून प्रयोग सुरू केले जातील, अशी माहिती देशमुख यांनी दिली.

गेल्या वर्षी सोलापूर येथील सिंहगड कॉलेज येथे कृत्रिम पावसासाठी आवश्यक रडार बसविण्यात आले होते. त्याद्वारे माहितीचे संकलन व इतर कार्य सुरू होते. या शहराचे भौगोलिक स्थान हे महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त भागात असल्याने याचा फायदा होईल. तसेच कृत्रिम पावसाच्या प्रयोगामुळे येथील पाणीटंचाईचा प्रश्‍न मार्गी लागेल, असा दावाही त्यांनी केला.