Sat, Jul 20, 2019 10:37होमपेज › Mumbai-Thane-Raigad › गोळीबार करणारा भाडेकरू छापत होता नकली नोटा

गोळीबार करणारा भाडेकरू छापत होता नकली नोटा

Published On: Jul 09 2018 1:19AM | Last Updated: Jul 09 2018 12:59AMठाणे : प्रतिनिधी

घर सोडण्याच्या वादातून दिवा शहरात गोळीबार करण्यात आल्याची घटना गुरुवारी सायंकाळी घडली होती. हा गोळीबार करणार्‍या आशिष शिवकुमार शर्मा (30) या भाडेकरूकडून पोलिसांनी एक गावठी पिस्तूल आणि 6 जिवंत काडतुसे जप्त केली आहेत. दरम्यान, त्याने पिस्तूल कोठून आणि कोणत्या कामासाठी आणली याचा तपास पोलिसांनी केला असता तो नकली नोट छापणारा मास्टरमाईंड असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. 

दिवा पूर्व भागातील अभूदय बँक समोर असलेल्या अजील अपार्टमेंटमध्ये भाडेकरू म्हणून राहणार्‍या आशीष शर्मा याचा रूम मालकासोबत वाद झाला होता. रूम मालक संजीवकुमार गुप्ता (32) यांनी रूम साफसफाई करून द्या मगच डिपॉझिटचे पैसे परत मिळतील असे सांगितले होते. याचा राग आल्याने आशिष याने गुप्ता यांना मारहाण करीत त्याच्याकडील गावठी पिस्तूलमधून एक राउंड फायर केला. या घटनेत कुणीही जखमी झाले नसून  गोळीबार करणार्‍या इसमास पोलिसांनी ताब्यात घेत त्याने हे पिस्तूल कुठून आणले याचा तपास सुरू केला. दरम्यान आरोपीकडून नवनवीन खुलासे समोर येत असून त्याने हे गावठी बनावटीचे पिस्तूल उत्तर प्रदेशातून खरेदी केल्याची कबुली दिली आहे.